उर्मिला मातोंडकरला सोशल मीडियावर केलं जात आहे ट्रोल; काय आहे कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बॉलिवूडकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची तुलना ब्रिटिश सरकारच्या रौलट अ‍ॅक्टशी केली. पुण्याच्या गांधी भवन मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान यावेळी केलेल्या भाषणांत बोलतांना उर्मिला मातोंडकरने एक चूक केली ज्यामुळं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

गुरुवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर सीएए आणि एनआरसीवर बोलत होत्या यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, ”१९१९ मध्ये दुसरे विश्वयुद्ध संपल्यानंतर ब्रिटीशांना माहित होते की भारतात असंतोष पसरत आहे आणि या असंतोषाचा भडका बाहेर पडेल. या भीतीने म्हणूनच ब्रिटीशांनी एक कायदा आणला, ज्याच नाव रौलट अ‍ॅक्ट असं होत. रौलट आणि सीएए कायद्यात साम्य असून दोन्ही कायदे इतिहासातील काळे कायदे म्हणून ओळखले जातील” असं उर्मिला यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, आपल्या या वक्तव्यात उर्मिला यांनी एक चूक केली ती म्हणजे दुसरे विश्वयुद्ध संपण्याचे जे वर्ष (१९१९) त्यांनी सांगितले ते वर्ष पहिले विश्वयुद्ध संपल्याचे होते. त्यामुळं आपल्या भाषणांत इतिहातील घटनाक्रमाचा उर्मिला यांनी केलेल्या गोंधळामुळं, तिच्या इतिहासाच्या ज्ञानावरून तिला सोशल मीडियावर ट्रॉल केलं जात आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ सिनेमाचा पोस्टर रिलीज; प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

श्रीनगर महामार्गावरील चकमकीत ३ दहशतवादी ठार; चकमक अजूनही सुरु

 

Leave a Comment