हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यात अहमदाबाच्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मोटेराचे उदघाटन केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित मोटेरा स्टेडियमवरील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधित केलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा विशेष उल्लेख केला.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या नावावरून ट्रम्प यांना नावावर चिमटा काढाला. झालं असं, आपल्या भाषणात सचिनचा उल्लेख करताना ट्रम्प सचिनचे नाव उच्चारू शकले नाहीत. त्यांनी सचिन ऐवजी “सु-चिन तेंडुलकर असं म्हटलं.
ट्रम्प म्हणाले, “भारत हा असा देश जिथे सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत महान क्रिकेटर्सना लोक पूजतात”. मात्र, हे सांगात असतांना ट्रम्प यांना सचिनचे नाव काही व्यवस्थित उच्चारता आलं नाही. दरम्यान, आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला.
ज्यामध्ये रेकॉर्ड बुकमध्ये सचिनचे नाव सु-चिन असं रिप्लेस करत खट्याळपणे ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी भारतातातील दोन मोठ्या क्रिकेटरच्या नावाचा उल्लेख करताच संपूर्ण मोटेरा स्टेडियमवर लोकांनी एकाच जल्लोष व जयघोष केला. ट्रम्प यांनीसचिन आणि विराटच्या नावाचा उल्लेख करताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले होते.
Sach-
Such-
Satch-
Sutch-
Sooch-Anyone know? pic.twitter.com/nkD1ynQXmF
— ICC (@ICC) February 24, 2020
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
us-president-donald-trump-calling-sachin-tendulkar-soo-chin