वॉशिंग्टन । जगात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिकेत झाला आहे. देशात दररोज १५ हजारहून अधिक रुग्ण वाढत आहेत. इथल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाखांच्या वर गेली आहे. १ लाख १२ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरवलं आहे.
ट्रम्प या महिन्यापासून आगामी निवडणुकांसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू करणार आहे.एकीकडे ट्रम्प यांच्यावर अमिरिकेत कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळता आली नसल्याचा आरोप होत असताना त्यांनी प्रचार सभा घेणार असल्याचे जाहीर केलं आहे.
यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार असून 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याअनुषंगानं डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला टेक्सास, फ्लोरिडा, रिझोना आणि उत्तर कॅरोलिना येथे निवडणूक सभा घेणार असल्याचे जाहीर केले.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या ३ महिन्यांपासून निवडणूक रॅली अमिरिकेत बंद आहेत. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्याला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे पुन्हा एकदा उमेदवार असणार आहेत, जुलैमध्ये याची अधिकृत घोषणा होईल. दुसरीकडे डेमोक्रॅट्स पक्षाचे उमेदवार असलेले बिडेन यांनी उमेदवाराला पाहिजे तितकी मते मिळविली आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in