.. म्हणून डोनाल्ड ट्रम्प आणि झुकरबर्गला ट्विटरच्या सीईओने दिला ‘हा’ इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटची सत्य पडताळणी (फॅक्ट चेक) केल्यानंतर ट्विटरवर ट्रम्प आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी टीका केली होती. त्यानंतर आता ट्विटरचा सीईओ जॅक डोर्सी यांनी यापुढेही ट्विट्सची सत्य पडताळणी करणार असल्याचे ठणकावले आहे.एखाद्या ट्वीटच्या सत्यतेबाबत शंका आल्यास युजरना ट्विटर त्याविषयी सावध करते. मात्र, हा नियम अमेरिकेच्या अध्यक्षांना लावण्यास ट्विटर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नकार देत आहे. मात्र, मंगळवारी प्रथमच ट्विटरने आपले धोरण बदलत चक्क अमेरिकन अध्यक्षांच्या ट्वीटच्या सत्यतेबाबतही शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान, लोकांनी सोशल मीडियावर काय लिहावं, याबाबत सोशल मीडिया चालवणाऱ्या एखाद्या खासगी कंपनीने या प्रकरणात पंच अथवा मध्यस्थ बनू नये असं मार्क झुकरबर्गने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होत.यावर ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. एक कंपनी म्हणून सत्यता पडताळणीबाबत (फॅक्ट चेक) मी स्वत: जबाबदार आहे. त्यामुळे कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना या वादापासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भविष्यात जगभरातील विविध देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये चुकीच्या, खोट्या आणि भ्रम पसरवणाऱ्या माहितीबाबत आम्ही पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटबाबत ट्विटर कंपनीने प्रथमच सावधगिरीचा इशारा दिला. ट्रम्प यांनी मंगळवारी केलेल्या दोन ट्विटबाबत ट्विटरने इशारा झळकवला आहे. या दोन्ही ट्वीटच्या अखेरीस ट्विटरने एक लिंक दिली आहे. ‘मेल इन बॅलट्सची सत्यता तपासा’ अशी ही लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यास युजर ट्विटर मोमेंट्स पेजवर पोहोचतात व तेथे ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटच्या विषयाची सत्यता तपासता येते. तसेच ट्रम्प यांच्या दाव्याबाबतच्या नव्या बातम्याही वाचता येतात. ट्विटच्या वादानंतर सोशल मीडिया कंपन्यांना नियंत्रित करण्यासाठीच्या एका आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती व्हाईट हाउसने दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment