हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । USA Share Market : या वर्षी आतापर्यंतच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही निम्मे वर्ष बाकी असून यापुढेही बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घ्या कि, 1970 नंतर अमेरिकेत पहिल्यांदाच कोणत्याही वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इतकी विक्री झाली आहे.
एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना महागाई, मंदी आणि ग्राहकांचा विश्वास कमी होणे या तीन प्रकारच्या जोखीम दिसत आहेत. तसेच मंदी आली तर कंपन्यांचे मूल्यांकन आणखी खाली जाईल, असे गुंतवणूकदारांना वाटते. USA Share Market
बाजार आणखी घसरेल
होरायझन इन्व्हेस्टमेंट्सचे मेन इन्व्हेस्टमेंट ऑफिसर असलेलं स्कॉट लँडर सांगतात की,”भविष्यात बाजार आणखी 10 टक्क्यांनी घसरेल. तसेच मध्यवर्ती बँकेच्या धोरणात बदल झाल्यानंतरच बाजार खालच्या पातळीतून बाहेर येईल.” त्याबरोबरच मॉर्गन स्टॅनलीचे मायकेल जे. विल्सन यांनी म्हटले की,” आर्थिक संकुचिततेचा संपूर्ण परिणाम पाहण्यासाठी S&P 15-20 टक्क्यांहून जास्तीने घसरण्याची अपेक्षा आहे. तसेच तो आणखी 3000 अंकांनी घसरेल. त्याच वेळी, सॅक्सो बँकेच्या पीच गार्नरीने म्हटले की,” बाजारात आणखी 17 टक्क्यांनी घसरण होणे अपेक्षित आहे.” USA Share Market
सर्वाधिक घसरणाऱ्या स्टॉकच्या लिस्टमध्ये 2022 सामील
मीडिया मधील बातम्यांनुसार, फेडरल रिझर्व्ह कडून सध्या तरी लिक्विडीटी वाढवण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जाणार नाही. फेडरल रिझर्व्ह चलनवाढ रोखण्यासाठी धोरणात्मक दर वाढवत राहतील. या वर्षी बाजारात बऱ्याच वेळा मोठी घसरण झाली. 2022 मध्ये असे 14 दिवस होते ज्यावेळी S&P 500 मध्ये 2 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. त्यामुळे हे वर्ष सर्वाधिक घसरणाऱ्या वर्षांच्या लिस्टमध्ये सामील झाले आहे. USA Share Market
भारतावर कसा परिणाम होईल ???
फेड रिझर्व्ह कडून व्याजदरात आणखी वाढ झाल्यास भारतासारख्या देशात मोठ्या रिटर्नची अपेक्षा करणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे ते भारतीय बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात करतील. अमेरिकेतील मंदीमुळे भारताचा रुपया दिवसेंदिवस कमकुवत होतो आहे. यामुळे त्यामुळे आयात देखील महागेल. ज्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन खर्चावर होईल. मात्र रुपया लवकरच डॉलरच्या तुलनेत 80 च्या पातळीवर जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. USA Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.wsj.com/market-data/stocks
हे पण वाचा :
ITC Share : बाजारातील चढ-उतारातही ITC चे शेअर्स गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर !!!
EPFO : नोकरी बदलल्यानंतर अशा प्रकारे नवीन खात्यात PF चे पैसे कसे ट्रान्सफर करा
Business Idea : अत्यंत कमी खर्चात ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा भरपूर पैसे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, नवीन दर पहा