हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जेव्हा जेव्हा गुंतवणुकीबाबत बोलले जाते तेव्हा अनेकजण SIP करण्याचा सल्ला देतात. SIP म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना होय. या अंतर्गत तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून पुढे भरघोस रक्कम मिळवू शकता. परंतु त्याकरिता काही खास टिप्स वापरण्याची आवश्यकता आहे. या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी कालावधीत जास्त परतावा मिळेल.
1) फंड हिस्ट्री – कधीही कोणत्याही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची फंड हिस्ट्री चेक करा. तुम्हाला जर त्यात दीर्घ कालावधीपासून चांगली कामगिरी दिसून आली तर गुंतवणुकीचा निर्णय घ्या. त्याशिवाय कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नका.
2) एक्सपेंस रेशियो – ज्या म्युच्युअल फंडाचा एक्सपेंस रेशियो कमी आहे. अशाच फंडामध्ये गुंतवणूक करत चला. कारण की, गुंतवणूक करत असताना म्युच्युअल फंडाकडून आकारले शुल्क पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.
3) फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड – कधीही गुंतवणुकी पूर्वी फंड मॅनेजरचा अनुभव आणि कौशल्य पहा. तसेच फंड मॅनेजरचे ट्रॅक रेकॉर्ड देखील चेक करा. यातून तुम्हाला समोरील व्यक्तीवर विश्वास किती ठेवायचा याबाबत कल्पना येईल.
4) शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक – कोणत्याही गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित नियोजन करा. कारण दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे केल्यामुळे खूप कमी वेळा नुकसानाला सामोरे जावे लागते.
5) आर्थिक उद्दिष्टे ठरवा – SIP करताना सर्वात अगोदर तुमची आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. कमी कालावधीमध्ये जास्त नफा कसा मिळवता येईल यावर अधिक भर द्या.
6) योग्य फंड निवडा – कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करत असताना जोखीम घ्यायची तयारी ठेवा. तसेच तुम्ही निवडलेला फंड योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण अनेकवेळा फंडाच्या नावावर लोकांची फसवणूक केली जाते.
7) SIP ची रक्कम वाढवा – SIP ची रक्कम वाढवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. असे केल्यामुळे कमी कालावधीत अधिक निधी निर्माण होईल. रक्कम कमी निवडल्यानंतर तुम्हाला वेळही तितकाच द्यावा लागेल