FASTag च्या वापरामुळे आपला वेळ आणि पैसा कसा वाचेल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रोड ट्रिपमधून प्रवास करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. जी लोकं रस्त्यावरुन आपल्या वाहनांमधून लांब पल्ल्याचा प्रवास करतात, त्यांना आता ते पूर्ण करण्यास कमी वेळ लागेल तसेच खर्चही कमी होईल. वास्तविक, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोल प्लाझावर फास्टॅगद्वारे टोल घेणे सुरू केले आहे. ज्यामुळे आपल्याला यापुढे टोल प्लाझाच्या लांबलचक लाईनमध्ये उभे रहावे लागणार नाही. यासह, फास्टॅगमार्फत टोल कर भरणाऱ्यांना टोल टॅक्समध्ये काही सूटही मिळणार आहे. अशा परिस्थितीत, आपल्याला आता रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी कमी वेळ लागेल तसेच आपले पैसेही वाचतील. यासह, FASTAg वापरण्याचे आणखी बरेच फायदे देखील आहेत जे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

आपल्याकडे FASTAg नसल्यास डबल टॅक्स भरावा लागेल
आपण आपल्या वाहनावर अद्याप FASTAg इन्स्टॉल केलेला नसेल तर आपण तो लवकरच घेतला पाहिजे. कारण आता टोल प्लाझावर FASTag नसल्यास वाहनांकडून डबल टॅक्स आकारला जाईल. अशा परिस्थितीत तुमच्या खिशावर अधिक भार पडेल आणि तुमचा प्रवासही महाग होईल. त्याचबरोबर, सरकार रिन्यूअलसाठी वाहनावर FASTAg लावणे देखील बंधनकारक केले आहे.

फास्टॅगचे फायदे
FASTags टोल संकलनासाठीचे प्रीपेड रिचार्जेबल टॅग्ज आहेत जे वाहने चालवित असताना ऑटोमेटिक पेमेंट डिडक्शन करण्याची परवानगी देतात. देशभरातील 720 हून अधिक टोल प्लाझा टोल स्वीकारण्यास डिजिटलपणे सक्षम आहेत. वेगवान प्रोसेसिंग टाइम आणि RFID तंत्रज्ञानाद्वारे टोल शुल्कास सहज मान्यता मिळाल्यामुळे, ट्रॅफिक मधील अडथळे कमी होण्यास मदत होते आणि इंधनाची बचत होते.

याव्यतिरिक्त, डिजिटल व्यवहार शारीरिक संपर्क टाळतात आणि सुरक्षेमध्ये भर घालत असतात. सध्याच्या काळात जे खूपच महत्वाचे आहे. या व्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगलुरू या प्रमुख शहरांमध्ये कॉन्टॅक्टलेस आणि इंटर-ऑपरेबल पार्किंग सोल्यूशन्स यासारख्या नवीन वापरही राबविला जात आहेत. GMR हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाने यापूर्वीच NETC फास्टॅगसह कॉन्टॅक्टलेस कार पार्किंगची सुविधा सुरू केली आहे.

आता टोल पेमेंटसाठी ग्राहकांना सुट्टे पैसे बाळगण्याची आवश्यकता नाही. कारण तुमच्या बँक खात्यात कार्ड, UPI, NEFT आणि नेट बँकिंग यासह अनेक पेमेंट पर्यायांशी सहजपणे टॅग जोडले जाऊ शकतात. आगामी काळात, FASTag राज्य महामार्गावर व्यापकपणे स्वीकारला जाईल आणि युझर्ससाठी अधिक संबंधित बनविण्यासाठी नवीन वापर प्रकरणे तयार करण्यावर भर दिला जाईल. NETC फास्टॅगवर जवळपास 29 बँका लाइव्ह आहेत आणि ग्राहक कोणत्याही बँकेतून बँकांचा लाभ घेऊ शकतात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment