माझी पिल्लू माझी जानss.. उत्कर्ष शिंदेंचं नवं गाणं व्हेलेंटाईन वीकमध्ये रिलीज होणार; पहा व्हिडीओ

Utkarsh Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी संगीत कलाक्षेत्रात शिंदेशाही घराण्याचं मोठं नाव आहे. शिंदे घराणं गेल्या अनेक पिढ्यांपासून संगीताचा वारसा चालवत आहे. भावगीते, लोकगीते, कोळीगीते आणि उडत्या चालीची गाणी या घराण्याने संगीत विश्वाला व रसिक प्रेक्षकांना दिली. प्रल्हाद शिंदेनी दिलेला हा संगीताचा वारसा पुढे आनंद शिंदे यांनी चालवला आणि त्यांची मुलेही संगीत कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. आदर्श शिंदेने आपल्या गायकीने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तर उत्कर्ष शिंदेने केवळ संगीत कला क्षेत्रात नाही तर अभिनय विश्वातही पाय रोवले आहेत. अशातच हे दोन्ही भाऊ आता लवकरच एकाच प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला ‘नथीचा नखरा – नवारी साडी’ हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या व्हायरल झालेल्या ओळीतील शिंदेशाहीच्या आवाजाने एक अनोखी जादू पसरवली आहे. या गाण्यावर अनेक इन्स्टा रील व्हायरल होताना दिसत आहेत. या गाण्याला सिने गायक आणि शिंदेशाहीचा अविभाज्य भाग असलेल्या आदर्श शिंदेंचा आवाज लाभलेला आहे. त्याच्या दमदार आवाजाने नटलेल्या ‘माझ पिल्लू माझी जान’ या गाण्याचा आता लवकरच व्हिडीओ व्हर्जन येत आहे आणि यामध्ये उत्कर्ष शिंदे झळकणार आहे. त्यामुळे या व्हिडीओ व्हर्जन गाण्याबाबत एक विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Zeba Shaikh (@zeba_shaikh_06)

गायक आदर्श शिंदेचा गावरान बाज आणि महेश मांजरेकरांच्या तालमीत तयार झालेला आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता बिगबॉसचा मास्टरमाईंड, ऑलरॉनडर म्हणजेच डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे या गाण्यातून झळकणार आहे. त्याचा रांगडा लूक आपल्याला या गाण्यातून पहायला मिळणार आहे. नुकतच उत्कर्ष शिंदेने या गाण्याचं शूटिंग पुणें, इंदापूर, कोल्हापूर इथे पूर्ण केलं आहे. शिवाय या गाण्याचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. ते पाहता ही एक सुंदर प्रेम कथा असेल अस वाटतं आहे. या गाण्यातून पहिल्यांदाच उत्कर्ष ट्रैक्टर चालवताना, शेतीतली काम करताना असा बलदंड शरीराचा मर्द गडी दिसेल अशा भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

शिंदे बंधूंचं हे सुपरहीट होत असलेलं गाणं फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंटाईन वीक’मधे रिलीज होणार आहे. येत्या १० फेब्रुवारी २०२४ रोजी हे गाणं प्रेमीयुगलांच्या भेटीस येईल. हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरेल अशी आशा आहे. इन्स्टा रील पाहता युवा वर्गात या गाण्याबाबत एक वेगळाच जोश दिसतो आहे. व्हिडीओमध्ये उत्कर्षसोबत मॉडल जेबा शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच बॉलिवूड मधील नृत्य दिग्दर्शक बॉस्को सीजर ह्यांच्या कैंपमधील असिस्टेंट डायरेक्टर रवी यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. मराठवाड्यातील युवा गीतकार विक्रांत राजपूत यांनी गाण्याचे बोल आणि संगीत सर्व संयोजन पाहिले आहे. आदर्श आणि उत्कर्ष यांच्या चाहत्यांसाठी हे गाणं खास पर्वणी ठरणार आहे.