Uttan Bhyander Virar Sea Bridge : सरकारने मुंबईत विकास कामांचा सपाटा लावला आहे. नुकतेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले. त्यापूर्वी मुंबईच्या विकासात भर घालणारा अटल सेवा सेतू सुरु करण्यात आला. आता पुन्हा एकदा समुद्रावर मार्ग बांधण्यात येणार आहे. एम एम आर डी ए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (Uttan Bhyander Virar Sea Bridge) आता वर्सोवा विरार सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतलाय पण वर्सोवा विरार असा थेट सागरी सेतूच्या संरचॅनेल बदल करण्यात आला असून या सागरी सेतू ऐवजी आता उत्तन म्हणजेच भाईंदर विरार असा सागरी सेतू एमएमआरडीए बांधणार आहे. या प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
मुख्यतः मुंबईतील वाहतूक कोंडी दूर व्हावी या देशासाठी नवनवे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न (Uttan Bhyander Virar Sea Bridge) शासनाकडून केला जात आहे. महापालिकेकडून प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी सेतू बांधण्यात येत आहे. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ वांद्रे वर्सोवा सागरी सेतू बांधत आहे. या सागरी सेतूचा वर्सोवा विरार आणि पुढे पालघर असा विस्तार पुढे एमएमआरडीए कडून करण्यात येणार होता यासाठी एमएमआरडीए करून आराखडा तयार केला जाणार होता. असे असताना पालिकेने वर्सोवा ते दहिसर भाईंदर असा 22 किलोमीटरचा आणि 16,621 कोटी रुपये खर्चाचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान पालिकेच्या या सागरी किनारा मार्गामुळे वर्सोवा विरार सागरी सेतूची (Uttan Bhyander Virar Sea Bridge) आवश्यकता नाही. त्यामुळे एकाच परिसरात दोन प्रकल्प होणार असल्याने राज्य सरकारने वर्सोवा विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार एम एम आर डी ए ने वर्सोवा विरार सागरी मार्गा ऐवजी उत्तन ( भाईंदर ) विरार असा सागरी सेतू बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. पालिकेचा सागरी मार्ग भाईंदरला जिथे संपेल तिथून एमएमआरडीएच्या सागरी सेतूला सुरुवात होणाऱ्या उत्तन भाईंदर विरार अशा सागरी सेतूचा नवा प्रस्ताव एमएमआरडीए ने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आता मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये याला (Uttan Bhyander Virar Sea Bridge) मान्यता देण्यात आली आहे.