हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील नुकतेच एक लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे.येथील एका क्वारंटाईन केंद्रावर दलिताने शिजवलेले जेवण जेवण्यास नकार दिल्यामुळे एका ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वृत्तानुसार, कुशीनगर जिल्ह्यातील खड्डा ठाण्या अंतर्गत भुजौली खुर्द खेड्यातील रहिवासी सिराज अहमद २९ मार्च रोजी दिल्लीहून परत आले होते आणि ते इतर चार जणांसह गावातल्या प्राथमिक शाळेत बांधल्या गेलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये थांबले होते.
वृत्तानुसार शुक्रवारी जेवण बनवणाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे ग्राम प्रमुख लीलावती देवी यांनी क्वारंटाईन सेंटरवरील सर्व ५ लोकांसाठी जेवण तयार केले, परंतु सिराज अहमद यांनी ते खाण्यास नकार दिला. पोलिसांनी तपास केल्यानंतर या व्यक्तीविरूद्ध सोमवारी एससी / एसटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ग्रामप्रमुखांनी याबाबत शुक्रवारी पोलिसांत लेखी तक्रार दिली आणि त्यासह उपविभागीय दंडाधिकारी देश दीपक सिंह आणि गट विभाग अधिकारी रमाकांत यांना कळविले.
खड्डा पोलिस स्टेशनचे एसएचओ आर के. यादव म्हणाले की, सिराजविरूद्ध एससी / एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी स्थानिक भाजपचे आमदार विजय दुबे हे गावप्रमुखांकडे आले आणि त्यांना हातांनी बनवलेले जेवण देण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘अस्पृश्यता हा एक सामाजिक गुन्हा आहे, जो कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.