औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे कोरोना लसीकरण मोहीम थांबावन्यात आली होती. पण आता लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. परंतू आता लसीकरण सुरु झाले असूनही औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरण मोहिम मंदावली आहे.
शहरात 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. लस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर सकाळ पासूनच नंबर लावत होते. दररोज 12 ते 17 हजार एवढे लसीकरण होत होते. पण आता पुन्हा लसीकरणाला प्रतिसाद मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून कमी लसीकरण असलेल्या देशात ‘डेल्टा’ जास्त सक्रिय होण्याची शक्यता जागतिक आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे.
पहिल्या लाटेत बाधितांपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या जास्त आहे. दुसरी लाट गंभीर होती. पहिल्या लाटेत ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाली. तेव्हा लसीकरण नव्हते. दुसऱ्या लाटेवेळी ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झाल्याचे ‘सिरो’ सर्वेक्षणातून समोर आले. पण, लाट थोपवू शकेल अथवा संसर्गाचा आलेख कमी होईल इतकी ही तयार झालेली ‘हर्ड इम्युनिटी’ पूरक नव्हती.देशातील बाधित व इतर लोकसंख्येच्या तुलनेत ‘हर्ड इम्युनिटी’ टक्केवारीत एक आकडीच आहे.
शहरात आतापर्यंत 4 लाख 46 हजार 132 नागरिकांचे लसीकरण झाले असून, पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 3 लाख 61 हजार 90 आहेत. टक्केवारी नुसार शहरातील लसीकरणाचा पहिला डोस 30.75 टक्के तर दुसरा डोस 8.99 टक्के एवढा आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लसीकरणाचा पहिला डोस 16.00 टक्के आणि दुसरा डोस 3.69 टक्के एवढा आहे. शहरात आतापर्यंत 4 लाख 46 हजार 132 नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यापैकी हेल्थ वर्कर यांना 28 हजार 356, फ्रंटलाईन वर्कर यांना 37 हजार 628, 18 ते 44 वयोगट 1 लाख 30 हजार 572, आणि 45 वर्षांवरील 1 लाख 65 हजार 352 यांचा यात समावेश आहे.