औरंगाबाद | गेल्या 1 मे रोजी शहरातील तीन लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची सुरुवात झाली. तब्बल 300 जणांना औरंगाबाद शहरात 1 मे रोजी लास देण्यात आली.
आज ( 3 मे ) रोजी औरंगाबाद शहरात जवळ जवळ सर्व लसीकरण केंद्रात लसीचा तुटवडा असल्याकारणाने लसीकरण बंद आहे. औरंगाबाद शहरातील पदमपुरा या लसीकरण केंद्रावर ‘लसीचासाठा संपाला असल्याने लसीकरण आज बंद आहे’ असे सूचनाफलक सुद्धा लावण्यात आले होते मात्र नागरिकांना पूर्वकल्पना नसल्याने त्यांची लसीकारणासाठी पायपीट झाली.
हॅलो महाराष्ट्रशी बोलताना पदमपुरा वैद्यकीय अधिकारी डॉ उज्ज्वला भाम्बरे यांनी सांगितले “सध्या लसीचासाठा उपलब्ध नाही. साठा उपलब्ध झाल्यास पेपरबाजीने सर्वाना कळवण्यात येईल तेव्हाच नागरिकांनी केंद्रावर यावे त्याशिवाय गर्दी करू नाही”