आयपीएल मधील ‘हे’ 2-3 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात ; आजचा सामना रद्द होणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून आता थेट आयपीएल वर कोरोनाचे संकट आले आहे. आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर संघाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

आजचा सामना होणार रद्द?

आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार होती. कोलकोताचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ देखील आता विलगीकरणात गेला असल्यानं आजचा सामान होऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केकेआरच्या संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स  Pat Cummins देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची माहिती ऑस्ट्रेलियातील एका वृत्तसंस्थेनं दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like