बीड : अमदनगर जिल्हयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपल्या नातेवाईकांना देण्यासाठी आरोग्य केंद्रातून लस चोरून आणली. आष्टी तालुक्यातील कडा आरोग्य केंद्रात जाऊन त्याने ही लस नातेवाईकांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने हा प्रकार समोर आला आता या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवला जाणार आहे.
विठ्ठल खेडकर असे कोरोना प्रतिबंधक लस चोरणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो नगर जिल्हयातील कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. शनिवारी त्याने कोरोना प्रतिबंधक लसीची एक व्हायल चोरून कडा आरोग्य केंद्रात आणली येथे आपल्या सहा नातेवाईकांना लक्ष देण्यास सांगितले.
परंतु हा प्रकार गंभीर असल्याने कर्मचाऱ्याने वैद्यकिय अधिकाऱ्यांना सांगितला. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांना सांगितला यावर त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.




