वाढवण बंदराजवळ उभारण्यात येणार टेक्सटाईल पार्क; 1200 एकरात होणार प्रकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारच्या माध्यमातून आता राज्यभर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकल्पांची देखील उभारणी होत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार सरकार पालघर तालुक्यातील डहानूमधील वाढवन हे बंदर उभारण्यासाठी तयारी करत आहे. सरकार आता या वाढवण या बंदरासाठी रस्ता आणि रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया करणार आहे. आणि याबद्दलच महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे या बंदराजवळ एक मोठं वस्त्र उद्योग म्हणजे टेक्स्टाईल पार्क भरण्यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे. आणि यासाठी पालघर जिल्ह्यातील जवळपास 1200 एकर जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सरकार आता पालघर जिल्ह्यातील माहीम आणि टोकराळे या गावातील जमीन भूसंपादन करण्यासाठी वापरणार आहे. तसेच आता बांधकाम विभागाकडून देखील याच सर्वे करण्यात आलेला आहे. वाढवण या बंदराजवळ प्रकल्प उभा केल्याने खूप फायदे होणार आहे. निर्यातीसाठी देखील अत्यंत सोपे होणार आहे. परंतु आता हा उद्योग नक्की कोण चालवणार? खाजगी उद्योजक चालवणार की सरकारी याबद्दल कोणतीही माहिती अजून स्पष्ट झालेली नाहीये. परंतु आता टेक्स्टाईल पार्कसाठी मोठे रस्ते बांधण्यात देखील येणार आहेत. आणि या प्रकल्पासाठी त्यांना 65 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे नवीन पाण्याचे बंधारे देखील बांधले जाणार आहेत.

पालघर तालुक्यात आता दुग्ध व्यवसाय विभागाकडे टोकराळे येथील अनेक सर्वे नंबर हे या जागांच्या लगतच्या भागातील शासकीय जागांमध्ये टेक्सटाईल पार्क भरण्यासाठी घेतले जाणार आहे. या संदर्भात त्याचप्रमाणे मुंबईतील कोस्टल रोड देखील आता वाढवण्या बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे. पालघरमध्ये विमानतळ बांधण्यासाठी जमिनीचा अहवाल देखील मागवण्यात आलेला आहे वाढवण बंदराची विमानतळ आणि कोस्टल रोड यांच्याशी जोडला, तर येथील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि या भागाचा विकास देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

महाराष्ट्र सध्या मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बद्दल ही दोन मोठी बंदरे आहेत. मुंबई शहराचा विकास तसेच इतर भौगोलिक कारणांमुळे या बंदरातून जास्त वाहतूक करणे आता शक्य होत नाही. त्याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची कंटेनर हाताळण्याची क्षमता देखील कमी होत चाललेली आहे, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे देशातील आयात आणि निर्यात क्षेत्रात वाढ करण्यासाठी आता आणखी एका बंदराची गरज लागणार आहे. आणि त्यामुळेच वाढवण बंदर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे.