महाबळेश्वर प्रतिनीधी | महाराष्ट्र पोलीस दलाच्या विषेश गृहसचिव अमिताभ गुप्ता याच्या विषेश पत्राद्वारे खंडाळ्याहुन महाबळेश्वर येथे संचारबंदीची ऐशी तैशी करत दाखल झालेल्या वाधवान कुटुंबावर आता प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. वाधवनान पाचगणीन येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करत पांचगणी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. काल त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असून वाधवान यांना जिल्ह्यातून बाहेर न पडण्याचे आदेश सीबीआय न्यायालयाने दिले. आज मनिलाॅड्रीगमध्ये ईडीच्या रडारवर असलेल्या कपील वाधवान व धीरज वाधवान या डीएचएफएलच्या संचालकांच्या उच्चभ्रु व महागड्या रेंजरोव्हर गाड्यांसह पाच हायक्लासगाड्या पांचगणी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. मुंबई ईडी कार्यालयाचे सहाय्यक निदेशक राम दिक्षीत यांच्या आदेशावरुन सदर कारवाई करण्यात आल्याचे समजत आहे. वाधवान बंधुनवर इडी कार्यालयकडून जप्तीची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे .
खंडाळ्याहुन महाबळेश्वरला दाखल झालेल्या वाधवान कुटुंबाला संचार बंदीचे उल्ल्घन व कोव्हीड १९ साथी रोगाच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन वाधवान कुटुंबाला पाचगणीच्या सेट झवेरीर्यस शाळेच्या होस्टेल इमारतीमघ्ये संस्थात्मक विलगीकरणाकरीता ठेवण्यात आले आहे. मात्र मनिलाॅड्रींगच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या कपील वाधवान व धीरज वाधवान या डीएचएफएल कंपनीचे संचालक भारत सरकारच्या ईडीच्या मुंबई कार्यालयाने दोन रेंज रोव्हर तीन टोयोटा फोर्च्युनर हाय क्लास महागड्या वाधवान बंधुच्या मालकीच्या गाड्या मनिलाॅड्रीग कायद्याअंतर्गत जप्त केल्या असुन त्यावर सील लावण्यात आले आहे. तसेच काल सीबीआय न्यायालयाने वाधवान बंधूंना ५ मे पर्यंन्त सातारा जिल्हा न सोड्ण्याचा आदेश दिले आहेत.
दरम्यान, वाधवान कुटुंबीय हे महाबळेश्वर चे नागरिक असल्याने उद्या पासुन ५ मे पर्यन्त वाधवान कुटुंब त्यांच्या महाबळेश्वरच्या वाधवान हाऊस मध्ये करणार पोलीस बंदोबस्तात वास्तव्य करणार असल्याचे बोलले जात आहे. सातारा जिल्हा सोडण्याआधी वाधवान यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची परवानगी घ्यावी लागणार अाहे. ३ मे पर्यन्तचा लाॅकडाऊन संपल्यावर CBI कडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे समजत आहे.