वैशाली खाडे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 सौ. वैशाली मोहन खाडे उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा ( दहिवडी) यांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम 6 सप्टेंबर 2021 रोजी पार पडला

आदर्श शिक्षिका सौ. वैशाली खाडे यांना सन्मानित करताना पालकमंत्री मा.ना. बाळासाहेब पाटील, अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा उदय कबुले साहेब, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी , उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे , समाज कल्याण सभापती सौ कल्पना खाडे मॅडम, महिला व बाल कल्याण सभापती सौ.सोनलीताई पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव साहेब, लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी प्राथमिक मा. श्रीमती प्रभावती कोळेकर मॅडम,जिल्हा परिषद सदस्य अरूण गोरे उपस्थित होते.

यावेळी सौ वैशाली खाडे बोलताना म्हणाले, की या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांसाठी इथून पुढे असेच विविध उपक्रमशील उपक्रम राबवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here