हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) सर्वात आधी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितकडून सुरुवातीच्या टप्प्यात ११ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती जागावाटपाच्या फेऱ्यात अडकली असताना वंचितने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत खरोखरच आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली.
कोणकोणत्या मतदारसंघातील उमेदवारी जाहीर ?
वंचित बहुजन आघाडीने ज्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी आम्ही विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केलं आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही पैशाचा महापूर बघितला होता. आता विधानसभा निवडणुकीत महापुराचा महापूर येईल असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळे उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून यादी जाहीर करतोय असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.
अशी आहे वंचितच्या उमेदवारांची यादी-
रावेर – शमिभा पाटील
सिंधखेड राजा – सविता मुंडे
वाशीम – मेघा डोंगरे
धामगाव रेल्वे- निलेश विश्वकर्मा
नागपूर साऊथ वेस्ट – विनय भांगे
डॉ. आविनाश नन्हे – साकोली
फारुख अहमद – दक्षिन नन्हे
शिवा नरांगळे -लोहा
विकास रावसाहेब दांडगे- औरंगाबाद (संभाजीनगर)
किसन चव्हाण – शेवगाव
संग्राम माने – खानापूर