वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं टरफल; ‘एअर इंडिया’ कंपनीकडून केटररला दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्यामुळे एअर इंडिया विमान कंपनीने संबंधित केटररला दंड ठोठावला आहे. पुणे – दिल्ली फ्लाईटमध्ये देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याचं कवच आढळल्याची तक्रार चव्हाण यांनी रविवारी केली होती.

राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर खासदार असलेल्या वंदना चव्हाण १ऑक्टोबरला पुण्याहून दिल्लीला चालल्या होत्या. यावेळी विमानात आपल्याला दिलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याच्या कवचाचे तुकडे सापडल्याचा दावा त्यांनी केला होता. तसे फोटो ट्वीट करत वंदना चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता.

एअर इंडियाच्या विमानात पुरवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. ‘काही दिवसांपूर्वी भल्या सकाळी एअर इंडियाच्या फ्लाईटने पुण्याहून दिल्लीला जात होते. ब्रेकफास्टला मी ऑमलेट मागवलं. तीन-चार घास खाऊन झाल्यावर अंड्याच्या कवचाचे तुकडे त्यात दिसले’ असं ट्वीट वंदना चव्हाण यांनी रविवारी केलं.हे कमी म्हणून की काय, कुजलेले बटाटे, अर्धवट शिजलेले दाणे, जॅमच्या डब्यावर पांढुरकी पावडर अशा गोष्टीही निदर्शनास आल्या. मी एअर इंडियाकडे तक्रार नोंदवली आहे. ती संबंधितांपर्यंत पोहचेल आणि कारवाई केली जाईल, अशी आशा व्यक्त करते, असं चव्हाण यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

इतर काही बातम्या-