Vande Bharat Express : पुणे मुंबईकरांना घेता येणार गजानन महाराजांचे दर्शन ; सुरु होणार 2 वंदे भारत एक्सप्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे ! शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. पुणे आणि मुंबई (Vande Bharat Express)सारख्या मोठ्या शहरांमधून शेगावला येणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. ही बाब लक्षात घेवून पुणे आणि मुंबई मधून शेगावसाठी 2 वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार , मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव या मार्गावर दोन वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आहे. या प्रस्तावाला मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. राज्यातल्या इतर ठिकणांहून शेगावला येण्यासाठी बाय रोड हा पर्याय आहे. मात्र त्यासाठी वेळ आणि जास्त पैसे दोन्ही खर्च होतात. शिवाय प्रवासाची दगदग देखील होते मात्र वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु झाल्यानंतर वेगवान आणि आरामदायी प्रवासाद्वारे तुम्ही गजानन महाराजांचे दर्शन घेऊ शकता.

शेगाव म्हणजे विदर्भातील (Vande Bharat Express) संत गजानन महाराजांची पंढरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. याठिकणी दररोज भेट देणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. हेच बाब लक्षात घेऊन पुणे आणि मुंबई ते शेगाव या दोन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून या ठिकाणी भेटदेणाऱ्यांचा प्रवास आरामदायी होईल.

तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणार वंदे भारत (Vande Bharat Express)

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने मे 2024 पर्यंत विविध तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना (Vande Bharat Express) जोडणाऱ्या 30 ते 35 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे. शेगावही त्यापैकीच एक आहे. शेगाव येथील श्रीक्षेत्र गजानन महाराज येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रवासाचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.

जळगाव आणि भुसावळ थांबा घेण्याचीही शक्यता

शिवाय, जळगाव आणि भुसावळमधील प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे (Vande Bharat Express) या स्थानकांवर वंदे भारत गाड्या थांबण्याची शक्यता आहे. वंदे भारत ट्रेनने त्यांच्या आरामदायी आणि वेगवान प्रवासाच्या अनुभवामुळे प्रवाशांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. वंदे भारत गाड्यांच्या यशाने, कार्यक्षम आणि आरामदायी रेल्वे वाहतुकीची वाढती मागणी पूर्ण करून भारतभरातील विविध भागात असे आणखी प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे.