Vande Bharat Express : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या बोलबाला पाहायला मिळत आहे. आरामदायी प्रवासासाठी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलेल्या या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची मोठी पसंती पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार सुद्धा वंदे भारत ट्रेनला प्रोत्साहन देत असून सातत्याने नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत आहे. देशात आजघडीला ४१ वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून धावत असून यामध्ये आपल्या महाराष्ट्राला सुद्धा आत्तापर्यंत ७ रेल्वे मिळाल्या आहेत. आताही आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल होणार असून ती पुणेकरांना मिळणार आहे.
खरं तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ७ वंदे भारत एक्सप्रेस धावत असल्या तरी थेट पुण्यावरून अशी स्पेशल; कोणतीही वंदे भारत ट्रेन उपलब्ध नाही. मुंबई सोलापूर वंदे भरून पुण्यावरून जाते इतकेच…. परंतु आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे ते बेळगाव (Belgaum To Pune) वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रथमच हक्काची अशी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला आता यश आलं असून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे.
बेळगाव वरून पुण्याला नोकरी किना शिक्षणानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे एकमेकांना थेट जोडणं आवश्यक होते. आता पुणे ते बेळगाव वंदे (Vande Bharat Express) भारत एक्सप्रेस सुरु झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवाशांना ही आनंदाची गोष्ट असेल. बेळगाव, बॉर्डर परिसर, तसेच कोल्हापूर या मार्गावरून ही ट्रेन धावेल. या रेल्वेला रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्षात या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात कधी होईल आणि ती प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
महाराष्ट्राला आत्तापर्यन्त किती वंदे भारत ट्रेन मिळाल्या – Vande Bharat Express
देशातील सर्वात महत्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्राला आत्तापर्यंत ७ वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. यामध्ये मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, मुंबई ते जालना, नागपूर ते बिलासपुर, इंदोर ते नागपूर या मार्गांचा समावेश आहे. येत्या काळात महाराष्ट्राला आणखी ७ वंदे भारत ट्रेन मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला चालना मिळेल.