Vande Bharat Express : काय सांगता …! वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणात आढळले झुरळ, रेल्वेचीही प्रतिक्रिया

vande bharat express food
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Express : भारतभ्रमणासाठी सुखसोयींनीयुक्त असलेली ट्रेन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) म्हणून या गाडीचा नावलौकिक आहे. शिवाय या गाडीच्या लोकप्रियतेमुळे या गाडीच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र आता वंदे भारताच्या प्रतिमेतला गालबोट लावणारी माहिती समोर आली आहे. वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वेच्या जेवणात चक्क मेलेले झुरळ आढळले. या घटनेमुळे रेल्वेला प्रवाशाची माफी मागावी लागली आहे. चला जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण ?

1 फेब्रुवारी रोजी वंदे भारत एक्स्प्रेसने (Vande Bharat Express) राणी कमलापती ते जबलपूर जंक्शन असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे दिल्या जाणाऱ्या जेवणात मेलेले झुरळ आढळल्याने धक्का बसला.प्रवाशाने X (पूर्वीचे ट्विटर) वर जेवणाची अनेक छायाचित्रे शेअर केली, ज्यामुळे या पोस्टवर भारतीय गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत . आयआरसीटीसीनेही या घटनेची दखल घेत व्हायरल झालेल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली.

काय आहे प्रवाशाची पोस्ट ? (Vande Bharat Express)

डॉ शुभेंदू केशरी नावाच्या या प्रवाशाने वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat Express) मिळालेल्या मांसाहारी थाळीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जेवणात मेलेले झुरळ दिसत आहे. याशिवाय डॉ. केशरी यांनी जबलपूर स्टेशनवर याबद्दल दाखल केलेल्या तक्रारीचे छायाचित्रही शेअर केले. फोटोंसोबत, केशरी यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहले आहे की, “मी 1/02/2024 ट्रेन क्र. 20173 RKMP ते JBP (वंदे भारत एक्स्प्रेस) प्रवास करत होतो, त्यांनी दिलेल्या फूड पॅकेटमध्ये मेलेले झुरळ पाहून मला धक्का बसला”.

महतवाचे म्हणजे IRCTC ने या घटनेला तत्काळ प्रतिसाद (Vande Bharat Express) दिला. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला आलेल्या अनुभवाबद्दल माफी मागितली आणि सांगितले की संबंधित सेवा प्रदात्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. “सर, तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आमची माफी मागतो. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे, आणि संबंधित सेवा प्रदात्याला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय, देखरेखही वाढवण्यात आली आहे,” असे IRCTC ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

स्वतंत्रपणे, रेल्वे सेवेने ट्विटला प्रतिसाद दिला आणि सांगितले की तक्रार नोंदवण्यात आली आहे. “तुमची तक्रार RailMadad वर नोंदवण्यात आली आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे तक्रार क्रमांक (Vande Bharat Express) पाठवण्यात आला आहे,” त्यांनी लिहिले.