हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) देशभरात अनेक राज्यात सुरु करण्यात आली आहे. अत्यंत कमी वेळेतच वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या असून आता लवकरच कोकणाचा रूपातून महाराष्ट्राला चौथी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांची मोठी आनंदाची गोष्ट आहे.
मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत ट्रेनला येत्या ३ जूनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल. अजून तरी या ट्रेनसाठी बुकींग सुरु झाले नाही. परंतु एक-दोन दिवसांत आयआरसीटीसीच्या साईटवरुन बुकींग करता येणार आहे.
कोकणातील या वंदे भारत ट्रेनची वेळ काय ?
कोकणात धावणारी हि पहिली वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. त्यानंतर हि गाडी ठाणे येथे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, आणि मडगावला दुपारी १.२५ ला पोचेल. त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन मडगाव येथून दुपारी २.३५ वाजता सुटेल. त्यानंतर रत्नागिरीत ५.३५ ला येईल. खेड रेल्वे स्थानकात ६ वाजून 48 मिनिटांनी पोहचणार आहे तर छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १० वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.