Vande Bharat Express : वंदे भारत देणार महाराजा एक्सप्रेससारख्या सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ही एक्सप्रेस (Vande Bharat Express) अगदी कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस पडली आहे. या ट्रेनचा प्रवास हा अत्यंत सुखकर आणि जलद असल्यामुळे प्रवासी यास प्राधान्य देताना दिसून येतात. त्यामुळे वंदे भारतची लोकप्रियता सध्या गगनाला भिडली आहे. अश्यातच आता वंदे भारतकडून एक नवीन अपडेट आली आहे. त्यानुसार वंदे भारतच्या सुविधेमध्ये आणखी उच्च दर्जा दिला जाणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात. वंदे भारतमध्ये आता रॉयल ट्रेन पॅलेस ऑन व्हील्स आणि महाराजा एक्सप्रेससारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना ट्रेनमध्ये मिळतात त्यापेक्षा अधिक चांगल्या सेवा त्यांना मिळणार आहेत.

कोणत्या मिळणार सुविधा? Vande Bharat Express

महाराजा एक्सप्रेसमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा आता वंदे भारतमध्येही (Vande Bharat Express) मिळणार आहेत. त्यामुळे या अंतर्गत वंदे भारतमध्ये प्रवाश्यांना शीतपेय, केटरिंग, हाऊसकिपींग, प्रवासी संबंधित साहित्य आणि एक समर्पित अटेंडंट प्रदान केली जाणार आहे. जी ऑनबोर्ड आणि ऑफबोर्ड प्रवाश्यांना सेवा देईल. त्यामुळे प्रवाश्यांना नक्कीच उच्च दरज्याच्या सुविधा मिळणार आहेत. ज्यामुळे प्रवासी संख्येत अधिक वाढ होऊ शकते. आणि प्रवाशांचा प्रवास अगदी सुखकर होईल.

वंदे भारतमध्ये YSA होणार लागू

वंदे भारतमध्ये मिळणाऱ्या या नवीन सुविधेची सर्व सूत्रे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक कंपनीकडे सोपवण्यात आली आहेत. या संदर्भात रेल्वे बोर्डाने एक नवीन प्रवासी धोरण केवळ वंदे भारतसाठी जारी केले आहे. यामध्ये चेन्नई – म्हैसूर, चेन्नई तिरुनेलवेली, चेन्नई – कोईम्बतूर, तिरुवनंतपुरम – कासारगोड, चेन्नई – विजयवाडा यासोबतच दक्षिण भारतात धावणाऱ्या वंदे भारतच्या 12 गाड्यांसाठी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत YSA सुविधा लागू करण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा महाराजा एक्सप्रेसमध्ये आहे.

वंदे भारतमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी असेल एक व्यावसायिक सहाय्यक

वंदे भारतमध्ये (Vande Bharat Express) सुरु होणाऱ्या या नवीन सुविधेसाठी विविध गोष्टी समाविष्टीत केल्या आहेत. त्यातील एक म्हणजे वंन्दे भारत मधील प्रवाश्यांसाठी कंपनीचा एक व्यावसायिक सहाय्य्क मूल्यवर्धित सेवेत तैनात असणार आहे. जो प्रवाश्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी असेल. ज्यामध्ये दरवाजा जाम होणे, ट्रेनमधील डब्ब्याची माहिती व मनोरंजन, चार्जिंग पॉईंट मधील बिघाड, शौचालयातील पाणी या समस्या त्याद्वारे सोडवल्या जातील. त्यामुळे प्रवश्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.