हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vande Bharat Express Train । भारतीय रेल्वे विभागाने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे डब्बे १६ वरून २० करण्याचं रेल्वे विभागाने ठरवलं आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार वंदे भारत गाड्यांमध्ये अधिक डब्बे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सरसकट सर्वच ट्रेनमध्ये हे बदल करण्यात येणार नाहीत, तर फक्त ७ वंदे भारत एक्सप्रेस मध्ये हे बदल करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना आता अतिरिक्त सीट्स मिळणार आहेत, आरामदायी प्रवास करता येणार आहे तसेच रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे.
कोणकोणत्या रेल्वेचे डब्बे वाढवणार – Vande Bharat Express Train
१) मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल वंदे भारत
२) सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत
३) चेन्नई एग्मोर-तिरुनेलवेली वंदे भारत
४) मदुराई-बेंगळुरू कॅन्ट वंदे भारत
५) देवघर-वाराणसी वंदे भारत
६) हावडा-राउरकेला वंदे भारत
७) नागपूर-इंदूर वंदे भारत (Vande Bharat Express Train)
रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धी कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांच्या मते, “१६ डब्यांची ट्रेन २० डब्यांची केली जाईल आणि ८ डब्यांची ट्रेन १६ डब्यांची केली जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ७ या मार्गांवर 8 कोच असलेल्या 4 वंदे भारत गाड्या आणि 16 कोच असलेल्या 3 वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र आता डब्यांची संख्या वाढवली जाणार आहे. मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल, सिकंदराबाद-तिरुपती आणि चेन्नई एग्मोर-तिरुनेलवेली या तीन वंदे भारत मार्गांची संख्या १६ डब्यांवरून २० केली जाईल. तर सध्या ८ डब्यांच्या गाड्यांसह चालणाऱ्या मदुराई-बेंगळुरू कॅन्ट, देवघर-वाराणसी, हावडा-राउरकेला आणि इंदूर-नागपूर वंदे भारत ट्रेनच्या (Vande Bharat Express Train) डब्ब्यांची संख्या ८ वरून १६ डब्यांपर्यंत वाढवली जाईल. प्रवाशांच्या संख्येनुसार वंदे भारत ट्रेनमधील कोटचा आराखडा तयार केला जात आहे




