Vande Bharat Express : नागपूरला पुणे आणि मुंबईशी जोडणारी सेमी-हाय-स्पीड सुपरफास्ट ट्रेन सेवा वंदे भारत स्लीपर लवकरच सुरू होऊ शकते. ही ट्रेन महाराष्ट्रातील रेल्वे प्रवासामध्ये मोठा बदल घडवून आणेल. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वे बोर्डाला या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. सध्या या प्रस्तावाचे मूल्यमापन सुरू असून, याचा उद्देश प्रवाशांच्या सोयीसाठी आणि या महत्त्वाच्या मार्गांवरील कनेक्टिव्हिटी (Vande Bharat Express) सुधारण्यासाठी आहे.
सध्या प्रवासासाठी लागणारा वेळ (Vande Bharat Express)
सध्या नागपूर ते मुंबई मेल गाड्यांद्वारे प्रवासासाठी सुमारे 16 तास लागतात, तर सुपरफास्ट गाड्या 12 ते 13 तासांत हा प्रवास पूर्ण करतात. दुरांतो एक्सप्रेस ही तुलनेने वेगवान पर्याय असून, ती 11 ते 12 तासांत पोहोचते. मात्र, वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यास नागपूर-मुंबई प्रवासाचा वेळ 10 तासांपर्यंत कमी होईल.
नागपूर ते पुणे फक्त 3 तासांत (Vande Bharat Express)
वंदे भारतमुळे नागपूर-पुणे प्रवासाचा वेळ फक्त 3 तासांपर्यंत कमी होईल. सध्या नागपूर-पुणे मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळा धावतात, तर हमसफर एक्सप्रेस आठवड्यातून एकदा. याशिवाय, आजाद हिंद एक्सप्रेस आणि हटिया-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस देखील प्रवाशांसाठी पर्याय आहेत. मात्र, हंगामाच्या काळात या गाड्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा सामना करण्यात अपयशी ठरतात.
नागपूर-मुंबई मार्गावरील मर्यादित पर्याय
नागपूर-मुंबई मार्गावर विदर्भ एक्सप्रेस (गोंदिया-मुंबई मार्गावर धावणारी) आणि सेवाग्राम एक्सप्रेस (नागपूर-मुंबई मार्गावर धावणारी) या निवडक पर्यायांमुळे प्रवाशांना प्रतीक्षा यादीचा सामना (Vande Bharat Express) करावा लागतो.
वंदे भारत स्लीपरची गरज (Vande Bharat Express)
वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यास प्रवाशांच्या सुविधांमध्ये आणि कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे अनेक प्रवाशांना रस्त्यावरील प्रवासावर अवलंबून राहावे लागते.
लांब पल्ल्याच्या प्रवासाचा दर्जा उंचावणार
वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कमी वेळ, आधुनिक सुरक्षा सुविधा, आणि अधिक कार्यक्षमतेसह प्रवाशांना एक उत्कृष्ट प्रवास अनुभव देईल. वंदे भारत स्लीपरमुळे प्रवास अधिक सोयीस्कर, वेगवान, आणि सुरक्षित होईल.
बिझनेस प्रवासामुळे वाढलेला ट्रॅफिक
नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई मार्गांवरील प्रवासी संख्येत वाढ होण्याचे एक कारण म्हणजे व्यवसायासाठी होणारे प्रवास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील सहभागामुळे व्यवसाय क्षेत्राला चालना मिळेल, असा अंदाज (Vande Bharat Express) व्यक्त केला जात आहे.
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचे डब्बे कमी होणार
नागपूर-इंदूर आणि नागपूर-बिलासपूर वंदे भारत गाड्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. मात्र, नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त 40%-45% प्रवाशांची उपस्थिती असते. त्यामुळे या गाडीचे 20 डब्बे आठपर्यंत कमी करण्याचा विचार रेल्वे बोर्ड करीत आहे.
वेटिंग लिस्ट कमी होणार (Vande Bharat Express)
नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे मार्गांवर वंदे भारत ट्रेन्सची मागणी जास्त आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या आणखी वाढते. त्यामुळे या मार्गांवर दोन नवीन प्रीमियम गाड्या चालवणे फायदेशीर ठरेल. तसेच स्लीपर कोच असलेल्या गाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य ठरतील.
वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सुरुवातीने नागपूर, पुणे आणि मुंबई यांना जोडणाऱ्या रेल्वे प्रवासात महत्त्वाचा बदल घडणार असून, प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरेल.