हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वसामान्य प्रवाशांना कमी पैशात चांगल्या रेल्वे सुविधेचा अनुभव घेता यावा आणि लांबच्या पल्ल्याचा प्रवासही अगदी सुखकर व्हाव यासाठी वंदे भारत साधारण ट्रेन (Vande Bharat Sadharan Train) चालवण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न आहे. लवकरच देशातील ५ प्रमुख मार्गांवर वंदे भारत साधारण ट्रेन धावताना आपल्याला दिसेल. त्याच पार्श्वभूमीवर वंदे भारत साधारण एक्सप्रेस ट्रायल रनसाठी मुंबईतील वाडी बंदर यार्ड मध्ये पोचली आहे.
मुंबई – नाशिक कॉरीडॉरवर करणार चाचणी : Vande Bharat Sadharan Train
नवीन वंदे भारत साधारण एक्सप्रेस मुंबई येथील वाडी बंदर यार्डमध्ये रविवारी 29 ऑक्टोबर रोजी पोहचली आहे. वंदे साधारण एक्सप्रेसचे ट्रायल रन घेण्यात येणार आहे. या चाचणी साठी मुंबई ते नाशिक कॉरीडॉरचा वापर केला जाणार आहे . त्यानंतर ही ट्रेन मुंबई ते नवी दिल्ली मार्गावर चालवली जाणार आहे. मुंबई ते नाशिक या मार्गांवर वंदे साधारण चालवून डोंगराळ मार्गात रेल्वेची क्षमता तपासली जाणार आहे.
वंदे साधारण 130 किमी प्रतितास वेगाने धावण्यात सक्षम :
वंदे साधारण एक्सप्रेस (Vande Bharat Sadharan Train) ही 22 डब्यांची LHB नॉन- एसी 3- टायर स्लीपर ट्रेन प्रवाशांना परवडणारे भाडे देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. या ट्रेनची क्षमता 1,800 प्रवासी आहे इतकी आहे. वंदे साधारण दोन WAP5 लोकोमोटिव्हद्वारे पुश अँड पूल तंत्रज्ञानावर चालवण्यात येणार आहे. ट्रेन चे ऐरोडायन्यामिक प्रकारात डिजाईन करण्यात आले असून वंदे साधारण 130 किमी प्रतितास वेगाने धावण्यात सक्षम आहे.
लवकरच वंदे भारत एक्सप्रेस (स्लीपर) होणार लॉंच :
वंदे साधारण एक्सप्रेस (Vande Bharat Sadharan Train) सोबतच 12 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेमध्ये, रेल्वे बोर्डाचे सचिव मिलिंद देवसकर यांनी सांगितले की, भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर कोच आणि वंदे भारत मेट्रो सुरू करण्याची योजना आखत आहे. वेग आणि सुविधांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वंदे भारत स्लीपर्स आणि वंदे भारत मेट्रो ट्रेनची योजना आखत आहोत,” भविष्यात वंदे भारत एक्सप्रेसचे 400 युनिट ICF च्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहेत.