हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर भारतीय रेल्वे देशवासीयांच्या सेवेत वंदे साधारण एक्सप्रेस (Vande Bharat Sadharan Train) आणत आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस भारतातील अनेक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात चालवल्या जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाश्यांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसून येत आहे. परंतु वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्णपणे AC चेअरकार वर आधारित आहे. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसचे भाडे देखील अधिक आहे. त्यामुळे अनेक सर्वसासामान्य प्रवाशांना इच्छा असूनही वंदे भारतचा प्रवास करणं शक्य होत नाही, याच साठी गरिबाला सुद्धा परवडेल अशी वंदे भारत साधारण ट्रेन आणली आहे.
पाच रेल्वेमार्गांवर चालवण्यात येणार वंदे साधारण : Vande Bharat Sadharan Train
कमी पैशात आणि सर्व सुविधाने सुसज्ज असलेली वंदे भारत साधारण ट्रेन (Vande Bharat Sadharan Train) सर्वसामान्य प्रवाशांसाठीच आणली आहे. लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होत असतांना दुसरीकडे प्रवाशांना जास्तीचे पैसेही खर्च करू लागू नये यासाठी सरकारने वंदे भारत साधारण ट्रेन आणली आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील पाच वेगवेगळ्या मार्गांवर ही एक्सप्रेस चालवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये खालील रेल्वेमार्गाचा समावेश करण्यात आलेला आहे.
पटना – नवी दिल्ली
हावडा – नवी दिल्ली
हैद्राबाद – नवी दिल्ली
मुंबई – नवी दिल्ली
ऐर्नाकुलम – गुवाहाटी
पुश आणि पूल तंत्रज्ञानावर चालणार वंदे साधारण एक्सप्रेस:
वंदे साधारण एक्सप्रेस मधील सर्व डब्बे हे Non AC असणार आहेत. सर्वच डब्यासाठी सेकंड क्लास दर्जाचे तिकीट दर ठेवले जाणार आहेत. वंदे साधारण एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच परंतु सध्या स्वरूपात डिजाईन करण्यात आली आहे. वंदे साधारण एक्सप्रेस ही सध्या केसरी रंगात रंगवण्यात आली आहे. पुश आणि पूल तंत्रज्ञानावर वंदे साधारण एक्सप्रेस (Vande Bharat Sadharan Train) चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे ट्रेनची गती वाढणार आहे आणि प्रवाशांना या जलद वाहतुकीचा लाभ होणार आहे .