Vande Bharat Sleeper Coach : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन? कसा असेल रूट?

Vande Bharat Sleeper Coach
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारतचा बोलबाला हा संपूर्ण देशात गुंजतो आहे. खूप कमी वेळेत ह्या रेल्वेने नागरिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ही ट्रेन देशभरातील प्रवाशांच्या पसंतीस पडत असल्यामुळे ह्यामध्ये अजून कोणत्या नवीन सुविधा देता येतील ह्याकडे रेल्वे निर्मात्यांचे लक्ष असते. त्यातच आता वंदे भारतची स्लीपर कोच ट्रेनची (Vande Bharat Sleeper Coach) चर्चा सुद्धा जोरात सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी या स्लीपर कोचचे आतील फोटो शेअर करण्यात आले होते, त्यामुळे या स्लिपर ट्रेन बाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. आता हीच वंदे भारत स्लीपर ट्रेन पुणे शहरात धावणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

कशी असेल ही स्लीपर कोच ट्रेन ? Vande Bharat Sleeper Coach

स्लीपर कोच वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण 16 डब्बे असणार आहेत. तसेच एकूण 11 एसी टियर, 611 सीट निर्माण करण्यात आले आहेत. ह्या ट्रेन मधील विशेष बाब म्हणजे 4 एसी टियर-2 मध्ये एकूण 188 बर्थ असणार आहेत. तर एक फर्स्ट AC असणार असून त्यात 24 बर्थ असणार आहेत. असे मिळून ट्रेनमध्ये एकूण 823 सीट असणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास हा सुखकर होईल.

कुठून कुठे धावणार ही ट्रेन?

वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन (Vande Bharat Sleeper Coach) ही पुणे ते बंगलोर असा टप्पा पार करणार आहे. वंदे भारत ही सध्या लोकांच्या पसंतीस पडत असून ती आपल्याला शहरात कधी येईल अशी नागरिकांची आशा आहे. त्यामुळे पुणे शहरात प्रथम स्लीपर कोच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यातील पहिला टप्पा हा बेंगलोर ला जोडला जात आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही आनंदाची बाब मानली जात आहे. पुण्यात धावणारी ही वंदे भारत स्लीपर कोच पुणे – सिंकदराबाद शताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेसला एक पर्याय म्हणून असणार आहे. ही ट्रेन हा पट्टा एकूण 8 तासात पूर्ण करत होती. मात्र आता वंदे भारतचे आगमन झाल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होणार आहे.

2030 पर्यंत 300 ट्रेनची होणार निर्मिती

सध्या देशात एकूण 34 वंदे भारत ट्रेन आहेत. त्यातील चार ह्या महाराष्ट्रात सुरु करण्यात आल्या आहेत. लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसची ही संख्या 200 पर्यंत नेण्यात येणार आहे. तसेच 2030 पर्यंत यामध्येही वाढ करून ती 300 वरती नेण्यात येणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस मुळे लांबचा प्रवासही अगदी सुखकर होत आहे यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.