Vande Bharat Sleeper Express | मागच्या काही दिवसापूर्वीच वंदे भारत स्लीपर रेल्वेचा पहिला लूक समोर आला होता. त्यामुळे त्याच्या चर्चेला उधाण आले होते. अगदी 5 स्टार हॉटेल सारखा या रेल्वेचा आतला लूक आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर या वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे फोटो शेअर केले आहेत. परंतु ह्या रेल्वेसाठी नेमका खर्च किती लागणार आहे ह्याची माहिती समोर आली नव्हती. आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत.
ट्रेनसाठी तब्बल 115 कोटी रुपयांचा खर्च
स्लीपर वंदे भारत ही एवढी लाग्झरियस दिसून येत आहे. त्याचे फोटो सोशियल मीडियावर व्हायरल ही होत आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ह्या ट्रेन निर्मितीसाठी एकूण किती खर्च लागत असेल. तर वंदे भारतची ही ट्रेन एकूण 16 डब्यांची असून त्यासाठी तब्बल 115 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या स्लीपर वंदे भारत रेल्वेच्या किंमतीचा अंदाजे खर्च इन्टिंग्रल फॅक्ट्रीने 127 कोटी रुपये एवढा सांगितलं आहे.
Concept train – Vande Bharat (sleeper version)
Coming soon… early 2024 pic.twitter.com/OPuGzB4pAk
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 3, 2023
वंदे भारत ट्रेन कोणी तयार केली? Vande Bharat Sleeper Express
स्लिपर वंदे भारत ट्रेन ही काही महिन्यातच लोकांच्या सेवेसाठी हजर असणार आहे. मात्र एवढी चर्चा रंगणाऱ्या ह्या ट्रेनची डिजाईन व त्याचे पार्ट कोणी तयार केले? तर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या मॅकॅनिकल इंजिनिअर्संच्या टीमने तयार केली आहे. तसचे आता वंदे भारतचे एकूण 200 ट्रेन सेट बनवले जाणार असल्याची चर्चा आहे. वंदे भारत ट्रेनला एकूण 20 ते 22 डब्बे असणार आहेत. तसेच त्यात एकूण 857 बर्थ असतील त्यातील 34 हे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असून प्रवाश्यांसाठी 823 बर्थ असतील. ट्रेनमध्ये आता प्रत्येक डब्यासाठी स्वतंत्र पॅन्ट्री देखील असणार आहे. जी खाण्याचे पदार्थ प्रवाश्यांसाठी पुरवणार आहे.
2024 मध्ये सुरु होणार स्लीपर वंदे भारत
सर्वानाच आता स्लीपर वंदे भारतची आतुरता आहे. परंतु ही ट्रेन नागरिकांच्या सेवेत 2024 साली आणली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.