Vande Bharat Sleeper Train : महाराष्ट्रातील ‘या’ 2 शहरात धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. साध्या रेल्वेगाड्यानंतर वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन, वंदे भारत साधारण रेल्वे अशा नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या रेल्वेगाड्या रुळावर धावू लागल्या. लांबच्या प्रवासासाठी खिशाला परवडत असल्याने आणि महत्वाचे म्हणजे प्रवास आरामदायी असल्याने ग्राहकांची सुद्धा रेल्वे प्रवासाला चांगली पसंती पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु असून येत्या वर्षभरात वंदे भारत स्लिपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) सुद्धा रुळावर धावताना आपल्याला दिसेल. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रात धावेल. हि ट्रेन पुणे आणि नागपूर या २ शहरांना जोडेल.

नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) सुरु करण्याच्या हालचाली वेगाने सुरु आहेत. नागपूर हुन पुण्यात अनेकजण शिक्षण आणि नोकरीसाठी येत असतात. त्यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. अनेकदा रेल्वेचं कन्फर्म तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांची जावं लागत. सध्या नागपूरवरुन बिलासपूर आणि नागपूर-इंदूर मार्गावर वंदे भारत ट्रेन आहे. परंतु ही ट्रेन चेअर कार आहे. तर पुणे शहरातून नागपूरसाठी थेट वंदे भारत ट्रेन नाही. मात्र आता वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे या मार्गावर आणखी एक रेल्वेगाडी सुरु होणार आहे.

वंदे भारत स्लीपर कोचची वैशिष्ट्ये – Vande Bharat Sleeper Train

वंदे भारत स्लीपर ट्रेन मध्ये 16 कोच असणार आहेत. एसी 3 टियरचे 11 कोच, एसी 2 टियरचे 4 कोच, एसी फर्स्टचा एक कोच असणार आहेत. या ट्रेनमधून 823 व्यक्ती प्रवास करु शकणार आहे. त्यात एसी 3 टियरमध्ये 611, एसी 2 टियरमध्ये 188 तर एसी 1st मध्ये 24 जण प्रवास करु शकतील. वंदे भारतमधील स्लीपर इंटीरिअर अधिक चांगले केले गेले आहे. ट्रेनमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी स्वयंचलित दरवाजे असतील. मोबाइल फोन चार्ज करण्यासाठीही उत्तम तंत्रज्ञान दिले जाईल आणि डब्यात सेन्सर लाईट बसवले जातील. जे प्रवासी दिव्याच्या जवळ असतील तेव्हा आपोआप लाईट लागेल अन्यथा ते बंद राहतील.