कटरा-श्रीनगर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार, जाणून घ्या तिकीट दर, मार्ग आणि वेळापत्रक

0
1
shrinagar vande bharat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्री माता वैष्णो देवी कटरा (SVDK) ते श्रीनगर दरम्यानची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. काश्मीर खोऱ्यातील ही पहिली आणि केंद्रशासित प्रदेशातील तिसरी सेमी-हाय-स्पीड ट्रेन असेल. या गाडीने ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, तिचे संचालन व देखभाल उत्तर रेल्वे विभागामार्फत केले जाणार आहे.

कटरा-श्रीनगर वंदे भारत कधी सुरू होईल?

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन येत्या 15 दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

कटरा-श्रीनगर वंदे भारत तिकीट दर किती असेल?

कटरा ते श्रीनगर वंदे भारत ट्रेनच्या तिकिटाचे दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. परंतु अंदाजानुसार, एसी चेअर कारसाठी तिकीट दर ₹1500-1600 दरम्यान तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी ₹2200-2500 दरम्यान असतील. त्यामुळे हा प्रवास सामान्य प्रवाशांसाठीही परवडणारा ठरेल.

कटरा-श्रीनगर वंदे भारत मार्ग कोणता असेल?

ही वंदे भारत ट्रेन उधमपुर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) मार्गावर धावणार आहे. रियासी, सांगलदान, बनिहाल, काजीगुंड, अनंतनाग आणि अवंतीपोरा अशा स्थानकांवर ही गाडी थांबेल, ज्यामुळे या भागांमध्ये प्रवास अधिक सुलभ होईल.

कटरा-श्रीनगर वंदे भारतची वेळ?

वंदे भारत ट्रेन आठवड्यात सहा दिवस चालणार आहे. कटरा (SVDK) येथून ही गाडी सकाळी 8:10 वाजता सुटेल आणि श्रीनगरला सकाळी 11:20 वाजता पोहोचेल. श्रीनगरहून दुपारी 12:45 वाजता सुटून कटरा येथे संध्याकाळी 3:55 वाजता पोहोचेल. यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची योजना करण्यास सोपे जाईल.

कटरा-श्रीनगर वंदे भारतची खास वैशिष्ट्ये

ही ट्रेन विशेषतः काश्मीरमधील थंड हवामान लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. ती -20°C तापमानातही सहज चालू शकते. यात उष्णता नियंत्रणासाठी विशेष हिटिंग सिस्टम बसवले आहे, ज्यामुळे प्रवाशांना थंडीचा त्रास होणार नाही. ड्रायव्हरच्या केबिनमध्येही हीटेड विंडशील्ड आहे, ज्यामुळे काच धुकट होणार नाही. पाण्याच्या पाइपलाइन आणि बायो-टॉयलेट्समध्येही हिटिंग सिस्टम बसवले आहे, जेणेकरून पाणी गोठणार नाही.

काश्मीरसाठी महत्त्वाची भेट

कटरा-श्रीनगर वंदे भारत ट्रेनमुळे काश्मीरमधील प्रवास जलद आणि आरामदायक होईल. ही सुविधा तेथील नागरिकांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे.