हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग , तालुका कृषि अधिकारी कार्यालय एटापल्ली व ग्रामसभा सिनभट्टी यांच्या संयुक्त लोक सहभागातुन वनराई बंधारा बांधण्यात आले आहे. यात सिनभट्टी गावातील लोकांचा सहभाग होता.
गावा लगत नाल्याला वनराई बंधारा बांधण्यात आले आहे, या बंधाऱ्याचे महत्त्व उन्हाळ्यात पाणी साठवून राहावे व गावातील शेतकरी, जनावरे, रब्बी हंगामातील पिकांकरिता तसेच विहीरीच्या पाण्याची पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने , पाणी अडवून भुगर्भात पाणी मुरण्यास मदत होईल व ओलावा टिकून राहील, रब्बी हंगामातील पिकांना फायदा होवुन उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने मा. बह्राटे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली, मा. दिपक कांबळे उ.विभागीय कृषि अधिकारी अहेरी , मा. संजयकुमार गायकवाड तालुका कृषि अधिकारी एटापल्ली, मा. जे.डी. दमाहे मं.कृ.अ. कसनसूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा बांधण्यात आले.
यावेळी उपस्थित मा.सुधाकर दामजी नाईक माजी जि.प.सदस्य गडचिरोली, जी.एस.हिचामी कृषि सेवक जारावंडी , घनश्याम कदम नाईक ग्रामपंचायत सरपंच सोहगाव, बी.डी. पोटावी गाव भुमया , चैतु पांडुरंग पोटावी गाव पाटील, बी.एन.पोटावी गाव ग्रामसभा अध्यक्ष, एस .जे. हिचामी गाव ग्रामसभा सचिव, एम.के. पावे ग्रामपंचायत सदस्य सोहगाव व गावकरी उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’