हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसई- विरार महापालिका मुंबई विभागातील अतिशय महत्वाची महापालिका म्हणून ओळखली जाते. नाशिक आणि पालघर जिल्हातील लोकांना मुंबईत यायचे असेल तर या शहरातूनच जावे लागते. त्यामुळे कायमच वसई विरार भागात गर्दी असते. याचाच विचार करून काही वर्षापूर्वी महानगर पालिकेने १२ उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता, परंतु बजेट अभावी तेव्हापासून काम रखडले आहे. लोकांच्या वारंवार मागणीनंतर, महानगरपालिकेने पुन्हा प्रस्ताव पाठवला आणि ऑगस्ट २०२४ मध्ये प्रस्तावित उड्डाणपुलांच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला असून, उड्डाण पुलांची संख्या १२ वरून ७ करण्यात आली. या बदलामुळे ३ उड्डाणपूल एकत्र जोडण्यात येणार आहेत आणि काही स्थानिक जंक्शन्सवर प्रस्ताव स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाचा थेट फायदा वसई विरार मधील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई,नवी मंबई आणि ठाणे या तिन्ही शहराला जवळ असणारी वसई विरार महानगर पालिका आहे.त्यामुळे मुंबईतील बाधकाम व्यावसायिकांचा नवीन बांधकामासाठी वसई विरार हा सोयीचा पर्याय ठरतो. त्यामुळे या भागात नवीन वस्त्या आणि बाधकाम संकुल मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे.आजच्या परिस्थितीचा विचार केला तर वसईची लोकसंख्या जवळपास ३० लाखाच्या घरात गेली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनांची संख्या हि आता दुप्पट झालेली पहायेला मिळत आहे.या सर्वांचा विचार करत एमएमआरडीएने प्रस्तावित उड्डाणपुलाला निधी मंजूर केला आहे.
२०१४ मध्ये १२ उड्डाणपुलांचा प्रस्ताव–
भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन प्रमुख जंक्शन आणि रस्त्यांवर १२ उड्डाणपुल बांधण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. वसई विरार महानगरपालिकेने २०१४-१५ मध्ये १२ उड्डाणपुलांचा पहिला प्रस्ताव हा राज्य सरकारला पाठविला होता , परंतु बजेट अभावी काम रखडले होते . लोकांच्या सततच्या मागणीनंतर, महानगरपालिकेने पुन्हा प्रस्ताव पाठवला आणि ऑगस्ट २०२४ मध्ये प्रस्तावित उड्डाणपुलांच्या डिझाइनमध्ये काही बदल केले. त्यानुसार, १२ पैकी ३ उड्डाणपुल एकमेकांना जोडले जातील आणि २ उड्डाणपुलांचे रेल्वे उड्डाणपुलांमध्ये रूपांतर केले जातील.यामुळे पुलाची संख्या ७ करण्यात आली आहे.
या ठिकाणी ७ उड्डाणपुल उभारण्यात येणार –
१) बोलिंग-सायन्स गार्डन (विरार)
२) मनवेल पाडा-फुलपाडा (विरार)
३) वसंत नगरी एव्हर शाईन सिटी (वसई)
४. माणिकपूर-बाभोला नाका (वसई)
५) चंदन नाका (नालासोपारा)
६) रेंज ऑफिस (गोखीवारे, वसई)
७) पाटणकर पार्क- लक्ष्मी शॉपिंग सेंटर (नालासोपारा)




