पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास ते इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे विविध रिक्त (VSI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी दि. 05 आणि 11 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

संस्था – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
एकूण पदसंख्या – 3

भरली जाणारी पदे –
कार्यालयीन परिचर – 02 पदे
कनिष्ठ संशोधन फेलो – 1 पद

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 05 & 11 एप्रिल 2023 (पदांनुसार)
मुलाखतीचा पत्ता –

कनिष्ठ संशोधन फेलो पदासाठी अल्कोहोल तंत्रज्ञान आणि जैवइंधन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे याठिकाणी मुलाखत घेण्यात येईल. तर कार्यालयीन परिचर पदासाठी प्रशासन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे मुलाखतीस हजर राहावं लागेल.

मुलाखतीची तारीख – 05 & 11 एप्रिल 2023 (पदांनुसार)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
कार्यालयीन परिचर – 10th Class Pass.
कनिष्ठ संशोधन फेलो – M.Sc. (Microbiology/ Biotechnology) with GATE/M. Tech (Biotechnology/Biochemical Engineering)with GATE

मिळणारे वेतन –
कार्यालयीन परिचर Consolidated – Rs. 15000 to Rs.17,000/- दरमहा
कनिष्ठ संशोधन फेलो Consolidated Rs. 34,000/- दरमहा (VSI Recruitment 2023)

निवड प्रक्रिया –

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ गुणपत्रिका/प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्रके आणि अनुभव प्रमाणपत्रे प्रमाणित प्रतींसोबत आणावीत.
वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
संस्थेच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
जाहिरात (कार्यालयीन परिचर) – PDF
जाहिरात (कनिष्ठ संशोधन फेलो)  – PDF
अधिकृत वेबसाईट – www.vsisugar.com