कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत इतर मागास प्रवर्ग राखीव गटात पहिल्या फेरीत सहकार पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलचे विंग वसंतराव बाबुराव शिंदे यांनी पाच हजार 502 मतांची आघाडी घेतली आहे.
कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत इतर मागास प्रवर्ग राखीव प्रवर्गाचा पहिल्या फेरीतील जाहीर करण्यात आला आहे.त्यामध्ये एकूण 17 हजार 294 मतापैकी 16 हजार 957 मध्ये वैद्य ठरली आहेत. तर 337 मध्ये अवैद्य झालेले आहेत.
पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल वसंतराव बाबुराव शिंदे (विंग) 10 हजार 125, संस्थापक पॅनेल मिलिंद पांडुरंग पाटणकर (कासारशिरंबे) 4568, शंकरराव ज्ञानदेव रणदिवे (कासेगाव) 2198 अशी मते मिळाली असून अद्याप दुसरी फेरीची मतमोजणी बाकी आहे.