Saturday, January 28, 2023

भटक्या विमुक्त प्रवर्गातून सहकार पॅनलचे अविनाश खरात 5 हजार 600 मतांनी आघाडीवर

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वि.जा/भ.ज/विमा राखीव प्रवर्गातील पहिल्या फेरीत सहकार पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलचे खरातवाडी येथील अविनाश मधुकर खरात यांनी 5 हजार 612 मतांची आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत वि.जा/भ.ज/विमा राखीव प्रवर्गाचा पहिल्या फेरीतील जाहीर करण्यात आला आहे.त्यामध्ये एकूण 16 हजार 994 मतापैकी 16 हजार 615 मध्ये वैद्य ठरली आहेत. तर 379 मध्ये अवैद्य झालेले आहेत.

पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल अविनाश मधुकर खरात (खरातवाडी) 10 हजार 180, संस्थापक पॅनेल नितीन शंकर खरात (खरातवाडी) 4 हजार 568, रयत पॅनेल 2 हजार 130 अशी मते मिळाली असून अद्याप दुसरी फेरीची मतमोजणी बाकी आहे.