Vastu Tips : घरातील उत्तर दिशेला ठेवा ‘या’ वस्तू ; येईल धन, सुख आणि समृद्धी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vastu Tips : हल्ली घर घेताना ते वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही ? याकडे आवर्जून पहिले जाते. घरातील दिशा योग्य आहेत की नाही पहिले जाते. मात्र घर घेतल्यावर आपण आपल्या वस्तू आणि फर्निचर करवून घेतो. कधी कधी असे करत असताना आपण आपल्या घरातील चांगल्या दिशा ब्लॉक करतो. उदाहरणच द्यायचे झाले तर घरातील उत्तर दिशा ही घरात धन संपत्ती येण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. आपल्या घरात नेमक्या त्याच दिशेला गोंधळ असेल तर मात्र घरात पैशाचा प्रवाह थांबतो असे म्हणतात. मग अशावेळेला (Vastu Tips) कोणते उपाय करायचे याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया…

खरेतर उत्तर दिशा म्हणजे भगवान कुबेराचे स्थान मानले जाते. घरात सुख समृद्धी आणि धन हवे असल्यास ही दिशा मोकळी असायला हवी. आपल्याकडून नेमका याच दिशेला अडगळ कचरा वैगैरे ठेवला गेला तर या दिशेला अडथळा (Vastu Tips) निर्माण होऊन घरातील पैशांचा प्रवाह थांबतो असे म्हणतात. चला तुमच्या घरातील उत्तर दिशा कशी प्रवाही होईल याचे उपाय जाणून घेऊया…

कुबेर यंत्र (Vastu Tips)

घरातील उत्तर दिशेचा स्वामी आणि देवता कुबेर आहे म्हणून त्याचं साधनस्वरूपी या दिशेने स्थापित केलं पाहिजे. कुबेर यंत्र फ्रेम मध्ये जोडले जाऊ शकते किंवा ते पारा,स्फटिक इत्यादी धातू रत्न यांच्यापासून देखील बनवले जाऊ शकते. कुबेर यंत्र उत्तर दिशेला ठेवल्यामुळे आर्थिक समृद्धी येते आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात असे म्हटले जाते

पाण्याचे कारंजे

उत्तर दिशेला पाण्याची कारंजे ठेवल्यामुळे ती दिशा प्रवाही होते, जागृत होते आणि त्यामुळे या घरात राहणाऱ्या (Vastu Tips) लोकांच्या करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते कामातील अडथळे दूर होतात धन, सुख, समृद्धी मिळते.

लकी प्लांट्स

घरात जर काही विशिष्ट रोप लावली तर त्याचे शुभ परिणाम (Vastu Tips) वाढू शकतात. मनी प्लांट, क्रसुला किंवा तुळशीच रोप हे उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्तीत वाढ होते.

भिंतीचा रंग

भिंतीचा रंग हा खूप महत्त्वाचा आहे. तो चुकीच्या पद्धतीचा असला (Vastu Tips) तर उत्तर दिशेचे जे शुभ परिणाम होत असतात ते थांबतात. त्यामुळे भिंतीला रंग देताना हलका निळा, हिरवा किंवा पिस्त्याचा रंग नेहमी या दिशेला लावावा. हे रंग रोख प्रवाह वाढवतात.

चलन (Vastu Tips)

घराच्या उत्तर भिंतीवर सर्व चलनी नोटा फ्रेम करून ठेवण्याचा हा उपाय आहे. आता या नोटांची फ्रेम करत असताना त्याचा क्रम वाढण्यापासून कमी होण्याकडे असायला हवा. म्हणजेच सर्वात मोठ्या रकमेची नोट फ्रेमच्या वरच्या (Vastu Tips) बाजूला असेल. म्हणजेच 500, 200, 20 आणि 10 अशा पद्धतीमध्ये ह्या नोटा फ्रेम मध्ये ठेवून उत्तर भिंतीवर ठेवाव्यात. जी फ्रेम आहे ती फक्त सोनेरी रंगात असावी यामुळे तुमच्या घरात रोखीचा प्रवाह वाढेल आणि कामाला वेग येईल.