Lok Sabha Election 2024 Dates : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lok Sabha Election 2024 Dates । लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याबाबत पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. यंदा देशात एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रिलला होणार आहे. यामध्ये तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, जम्मू काश्मीरचा समावेश आहे. ४ जूनला संपूर्ण मतमोजणी होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे ला, चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे ला होणार आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे ला, त्यानंतर सहाव्या टप्प्याचे मतदान २६ मेला होणार आहे तर सातव्या टप्प्याचे मतदान १ जूनला होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या दिवशी कुठे मतदान होणार?? Lok Sabha Election 2024 Dates

पहिला टप्पा – नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर

दुसरा टप्पा – वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा- सातारा, सोलापूर, माढा, कोल्हापूर, सांगली, रायगड, कोल्हापूर, हातकणंगले, लातूर, उस्मानाबाद, कोकण

चौथा टप्पा – रावेर, मावळ, पुणे, नंदुरबार, जळगाव, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, शिरूर

मुंबईतील सहाच्या सहा जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होईल.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले कि, १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपतोय. त्यापूर्वी निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, देशात स्वतंत्र आणि निःपक्ष निवडणुका होतील. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार असून देशभरात दीड कोटी निवडणूक अधिकारी आहेत. तसेच साडेदहा लाख पोलिंग बूथ आहेत. ५५ लाखांपेक्षा अधिक EVM मशीन निवडणुकीसाठी तयार आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभरातू ४९ कोटी पुरुष आणि ४७ कोटी महिला मतदानाचा हक्क बजावतील. यातील १.८२ कोटी मतदार पहिल्यांदाच मतदान करताना दिसतील. 18 ते 29 वयोगटातील 21.50 कोटी मतदार आहेत. 82 लाख मतदार हे 85 वयापेक्षा अधिक आहेत. याशिवाय ४८ हजार तृतीयपंथी सुद्धा मतदानाचा हक्क बजावतील. प्रत्येक बूथवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि टॉयलेटची सुविधा असेल, विजेची सोया असेल उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी छताची सोया सुद्धा करण्यात येणार आहे. जे मतदार पोलिंग बुथवर येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी घरोघरी मतदानाची सोय करण्यात येणार आहे.