सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
सांगली मध्ये उत्तम मोहिते यांनी जन्मो-जन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणत वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली. मोहिते यांनी आपल्या पत्नी सोबत वडाच्या झाडाची पूजा करत ७ फेऱ्या घेतल्या. आजपर्यंत महिलाच पतीसाठी पूजा करतात पण पुरुष का करू शकत नाहीत असं म्हणत ही पूजा मोहिते यांनी केली.
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. यासाठी वटवृक्ष म्हणून वडाच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना करतात.
मी गेल्या अनेक वर्षांपासून वट पौर्णिमा सण करते. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, तसेच जन्मो जन्मी हाच पती मिळू दे यासाठी यासाठी मी प्रार्थना करते, आज पतीने माझ्यासाठी पूजा केली याचा मला अभिमान असल्याचं श्रीमती मोहिते यांनी यावेळी सांगितलं.