हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारताला अभिमान वाटेल अशी नुकतीच एक बातमी समोर आली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारात भारतीय कलाकारांनी बाजी मारली आहे. यावर्षी नेटफ्लिक्स निर्मित “वीर दास: लँडिंग” स्टँडअप कॉमेडीला एमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच, हा पुरस्कार डेरी गर्ल्स सीझन 3 आणि वीर दासच्या लँडींगला विभागून देण्यात आला आहे. खास बाब म्हणजे, एकता कपूर देखील एमी पुरस्काराची मानकरी ठरली आहे. ती हा पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय दिग्दर्शक आहे. त्यामुळे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
यापूर्वी ऑस्कर पुरस्कारावर RRR सिनेमाने आपले नाव कोरल्यामुळे भारताची मान अभिमानाने उंचावली गेली होती. आता पुन्हा एकदा भारताला अभिमान वाटेल अशीच ही बातमी आली आहे. टेलिव्हिजन क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्यामुळे एकता कपूरला एमी पुरस्कार मिळाला आहे. तसेच, वीर दासने देखील मानाचा एमी पुरस्कार पटकावला आहे. मात्र हा पुरस्कार डेरी गर्ल्स सीझन 3 आणि वीर दासच्या लँडींगला विभागून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्सच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून देण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/Cz5C8-SOPzQ/?igshid=ODhhZWM5NmIwOQ==
दरम्यान, टेलिव्हिजन आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये एमी पुरस्कार सर्वात मानाचा मानला जातो. एमी पुरस्कार हा ‘अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस’ ह्या अकादमीकडून देण्यात येतो. असे काही तुरळकच व्यक्ती असतात जे या पुरस्काराचे मानकरी ठरतात. यंदा हा पुरस्कार वीर दास आणि एकता कपूरने पटकावून नवा इतिहास रचला आहे. त्यांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.