Vegetarian Foods Contains High Protien | या 5 शाकाहारी पदार्थांनी मिळते जास्त प्रोटीन, आजच आहारात करा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetarian Foods Contains High Protien | आपल्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी प्रोटीन खूप गरजेचे असते. अनेकवेळा तुम्हाला प्रोटीनयुक्त गोष्टी खाण्यासाठी डॉक्टर सल्ला देतातm या प्रोटीनसाठी अनेकवेळा तुम्ही अंडी खाण्याबाबत ऐकले असेल. त्याचप्रमाणे चिकन मटन या गोष्टींमध्ये देखील हाय प्रोटीन असते. परंतु तुम्हाला माहित आहे का? काही शाकाहारी असेपदार्थ आहेत ज्यामध्ये अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन आहे. त्यामुळे जे लोक मांसाहार करत नाही. त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. आज आपण अशा काही पदार्थांची माहिती जाणून घेऊया ज्यांच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन (Vegetarian Foods Contains High Protien) असते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. अंड्यापेक्षाही जास्त प्रोटीन भोपळ्यांच्या बियांमध्ये असते. या बियांमध्ये निरोगी चरबी जीवनसत्वे आणि कॅल्शियम यांसारख्या गोष्टी असतात. त्यामुळे जे लोक अंड खात नाही त्यांनी जर भोपळ्यांच्या बियांचा समावेश आहारात केला, तर तुमच्या शरीराला सगळे पोषकतत्व मिळतील. एक चमचा भोपळ्याच्या बियांमध्ये 9 ग्रॅम प्रोटीन असतात तर एका अंड्यांमध्ये फक्त 6 ग्रॅम प्रोटीन असतात.

सोयाबीन

शाकाहार करणाऱ्या लोकांसाठी सोयाबीन हा प्रोटीनचा खूप चांगला स्त्रोत आहे. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे 36 ग्रॅम एवढे प्रोटीन असतात. त्यामुळे सोयाबीन हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे.

हरभरा | Vegetarian Foods Contains High Protien

तुम्ही जर शाकाहारी असाल आणि अंडी खात नसाल तर तुमच्यासाठी हरभरा हा प्रोटीनसाठी खूप चांगला पर्याय आहे. सकाळी भिजलेल्या हरभऱ्याचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी फायद्याचे आहे. 100 ग्रॅम उकडलेल्या हरभऱ्यांमध्ये जवळपास 19 ग्रॅम एवढे प्रोटीन्स असतात.

क्विनोआ

हा एक पालेभाजीचा प्रकार आहे.ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी हा पदार्थ खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे यामुळे तुमचे आतडे देखील निरोगी राहते.

डाळी

कडधान्य हा प्रोटीनचा खूप चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये दिवसातून एकदा तरी कडधान्य घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे डाळिंमध्येही खूप जास्त प्रोटीन असतात. त्याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर अँटीऑक्सिडंट मिळतात आणि शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून निघते.