हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने यापूर्वीच वेरिफायड अकाउंट साठी म्हणजेच ब्लु टिक साठी शुल्क केले आहे. त्यानंतर आता तरुणांच्या आवडीचे शोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी सुद्धा मेटा शुल्क आकारणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रिफायड अकाउंट साठी मेटा प्रतिमहीने 699 रुपये यूजर्सकडून वसूल करणार आहे. सध्या हे फीचर फक्त मोबाईल अॅपसाठी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की लवकरच वेब व्हर्जन देखील सुद्धा हि सुविधा देण्यात येणार आहे.
मेटा ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की भारतातील यूजर्ससाठी iOS आणि Android वर वेरिफायड अकाउंटसाठी 699 रुपयांचे मासिक शुल्क सुरु केलं आहे. येत्या काही महिन्यांत, आम्ही 599 रुपये प्रति महिना वेब साठी सुद्धा पर्याय सादर करू. व्हेरिफाईड अकाउंट सबस्क्रिप्शनसाठी, फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांचे खाते सरकारी आयडीने व्हेरिफाय करावे लागेल. व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युजर्सना अनेक विशेष फीचर्सचा लाभ मिळणार आहे.
व्हेरिफाईड अकाउंटला सुरक्षा आणि सपोर्ट मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये सुरुवातीच्या टेस्टिंग मध्ये अनुकूल परिणाम पाहिल्यानंतर कंपनी भारतात मेटा पडताळणीच्या चाचणीचा विस्तार करत आहे असेही कंपनीने म्हंटल आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या वेरिफायड अकाउंटसाठी कंपनीने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे पालन कर्ज गरजेचं आहे. तसेच ज्या यूजर्सनी आधीच आपले अकाउंट वेरिफाइड केलं आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे कंपनीने स्पष्ट केलं.