ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे अल्पशा आजाराने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ज्येष्ठ लेखक नंदा खरे (nanda khare) यांचे आज दुपारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन (passed away) झाले. त्यांचे मूळ नाव अनंत यशवंत खरे असे होते. मात्र ते नंदा खरे (nanda khare) या नावनेच मराठीत लेखन करत होते. मराठी साहित्यातील समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना स्थान देत त्यांनी कादंबरीलेखन केले होते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या नंदा खरे (nanda khare) यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या विशेष गाजल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘उद्या’ या कादंबरीसाठी 2020 साली साहित्य आकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता.

उजणी धरणाच्या बांधकामात महत्वाचा सहभाग
लेखक नंदा खरे (nanda khare) गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज दुपारी उपचारादरम्यान वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. नंदा खरे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपूरात झाले होते, त्यांनंतर त्यांनी मुंबईतील आयआयटी या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेऊन त्यांनी काही काळ एका खासगी कंपनीत काम केले होते, भीमा नदीवर बांधलेले उजणी धरणाच्या बांधकामात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

पुरस्कार आणि गौरव
नंदा खरे (nanda khare) यांना त्यांच्या लिखाणाबद्दल विदर्भ साहित्य संघाचा गो. रा. दोडक स्मृती वाड्मय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार, ‘शब्द: द बुक गॅलरी’ ह्या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार, तसेच त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य आकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. 2017 साली त्यांनी यापुढे कोणतेही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्या भूमिकेमुळेच आपण साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारला असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदा खरे यांचे साहित्य
अंताजीची बखर, इंडिका, उद्या, ऐवजी, कहाणी मानवप्राण्याची, कापूसकोड्यांची गोष्ट, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य, दगडावर दगड, नांगरल्याविण भुई, बखर अंतकाळाची, वाचताना, पाहताना जगताना, वारूळपुराण, वीसशे पन्नास, संप्रति, ज्ञाताच्या कुंपणावरून, दगड धोंडे, गावगाडाःशतकानंतर, ऑन द बीच हे त्यांनी (nanda khare) लिहिलेले साहित्य आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?

Leave a Comment