दिलीप कुमार झाले ९७ वर्षांचे ! बॉलीवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । लेजेंडरी स्टार दिलीप यांना ट्रॅजेडी किंग म्हणूनही ओळखलं जातं. वाढदिवसाच्या खास प्रसंगी त्यांना सेलेब्रिटींसह जगभरातील लोक शुभेच्छा देताना दिसत आहेत. या सगळ्यांचं प्रेम पाहून दिलीप कुमार भावूक झाले आहेत. 

 

दिलीप कुमार यांनी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे ट्विट करत आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये दिलीप कुमार म्हणतात, ’97 व्या वाढदिवसानिमित्त गेल्या रात्रीपासून मला फोन कॉल्स, मेसेज येत आहेत. सर्वांचे आभार. उत्सव साजरा करणं गरजेचं आहे. तुमचं सगळ्याचं प्रेम, ओढ आणि प्रार्थना पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत.’

 

 

97 वर्षीय दिलीप कुमार यांचं हिंदी सिनेमात मोठं योगदान आहे. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं आहे. ज्वार भाटा, अंदाज, देवदास, मुगल-ए-आजम, नया दौर, राम और शाम, गंगा जमुना, बैराग असे अनेक त्यांचे सुपरहिट सिनेमे सांगता येतील.

 

दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान निशान-ए-इम्तियाज देखील मिळाला आहे.