Video: शाळेला विद्यार्थ्यांना घेवून जाताना स्कूल बस पेटून जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
खंडाळा तालुक्यातील वाठार काॅलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. लोणंद- शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ ही घडली. सदर स्कूल व्हॅन ही गॅसवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. या घटनेत 8 ते 10 विद्यार्थी घेवून निघालेली स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लोणंद- शिरवळ मार्गावर सदरची घटना आज सकाळी घडली आहे. शाळेला मुले घेवून जाताना हा प्रकार घडला असून व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या आगीत स्कूल व्हॅन मात्र संपूर्ण जळून खाक झाली आहे. या स्कूल व्हॅनचा चालक हा वाठार काॅलनी येथील हायस्कूलचाच शिपाई असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघाताने स्कूल व्हॅनच्या आणि विद्यार्थ्यांच्ये सुरक्षीतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे खंडाळा, लोणंद परिसरासह सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.

या घटनेनंतर एक व्हिडिअो समोर आला असून विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत आहेत. तर दुसरीकडे स्कूल व्हॅन पूर्णपणे जळाल्याचे दिसत आहे. यावेळी विद्यार्थी शिक्षकांना या घटनेची कल्पना द्या म्हणून सांगत आहेत. तेव्हा सदरचे विद्यार्थी हे वाठार माध्यमिक विद्यालय, वाठार बुद्रुक येथील असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले आहे.