पुण्यात भाजपाचे पोलिसांना सोबत घेवून पैसै वाटप : रवींद्र धंगेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे। पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक आरोप उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. मतदानापूर्वी रवींद्र धंगेकर हे आक्रमक झाले असून ते आज कसबा गणपतीसमोर पत्नीसह उपोषणाला बसलेले आहेत. श्री. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसलेले आहेत.

उपोषणाला बसण्यापूर्वी रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘ पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपतर्फे लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल. भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, असा दावाही धंगेकर यांनी केलाय.

भाजप व शिंदे यांचे कार्यकर्ते पैसै वाटत आहे. परंतु अशावेळी आमच्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात नेवून धमकावले जात आहे. पोलिस यंत्रणा यांनी माहिती नाही का पैसे वाटत आहेत.