हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अखेर विधान परिषदेच्या उपसभापती निवडणूक पार पडली आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत बाजी मारली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे.
सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून घोषणा केली आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि त्याला शेकाप जयंत पाटील यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सभापतींनी नीलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली.
त्याआधी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवड करू नये, अशी मागणी केली होती. परंतु, सभापतींनी कोर्टात भाजप गेली आहे, कोर्टाने मला अद्याप काही कळवले नाही. त्यामुळे तुम्ही काय मागणी केली आहे, हे मान्य करणार नाही. विधिमंडळाला कोर्टाला आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे सभापती म्हणून निर्णय मी घेईल, अशा शब्दात सभापती निंबाळकर यांनी दरेकर यांना फटकारून काढले होते.
नीलम गोऱ्हे कायम संकटाच्या काळात मदतीस धावून जाणाऱ्या आहेत. महिला अत्याचारावर कायम आवाज उठवतात. सभागृह सदस्य म्हणून नीलम गोऱ्हे यांचे काम चांगले आहे. आधीही उपसभापती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. यापुढे चांगले काम करत राहावे अशा शुभेच्छा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’