‘वाघिणीला नेहमीच योग्य मार्ग माहित असतो..!’ विद्या बालनच्या ‘शेरनी’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा बहुप्रतीक्षित आणि आगामी चित्रपट ‘शेरनी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील विद्याच्या नव्या आणि आव्हानात्मक लूकला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझरदेखील रिलीज करण्यात आला आहे. ज्यात विद्या बालन एका घनदाट अशा जंगलात दिसत आहे. टिझर तर रिलीज झाला पण ट्रेलर २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या सोशल मीडियावर याबाबतची माहिती देताना लिहिले, काहीही फरक पडत नाही, ती योग्य गोष्टी करेल. २ जूनला ट्रेलर रिलीज होणार आहे. तर शेरनी जून, २०२१ ला प्राइमवर भेटीला येणार आहे.

अभिनेत्री विद्या बालनने याविषयी व्यक्त होताना लिहिले की, वाघांना त्यांचा मार्ग नेहमीच माहित असतो. सिंहिणीची डरकाळी ऐकण्यासाठी सज्ज रहा. ऑफिशिएल टीझर. २ जूनला रिलीज होणार ट्रेलर. शेरनी जून २०२१ला येणार भेटीला. ‘शेरनी’ या चित्रपटाचे कथानक अत्यंत खिळवून ठेवणारे आहे, यात विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या रुपात एका मुख्य आणि आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाणेदार भूमिकेत विद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “२०२० मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला, इतक्या यशानंतर आमची नवीकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला अत्यंत आनंद होतो आहे. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे. अगदी विषयाला समर्पकता प्राप्त करून देण्यासाठी कायमच अमितची मार्गदर्शक भूमिका लाभली आहे.

https://www.instagram.com/p/CO9sZ_UHICw/?utm_source=ig_web_copy_link

व्यंगात्मक टिप्पणी ही त्याची शैली या चित्रपटाला अत्याधिक रोचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे” टी-सीरीज आणि अंबडनतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, या अमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचे दिग्दर्शन पुरस्कार विजेता चित्रपटकार अमित मसुरकर याने केले आहे, ज्याला चित्रपट ‘न्यूटन’साठी समीक्षकांनी गौरवले होते.

Leave a Comment