आता लवकरच केले जाणार विजय मल्ल्या अन् नीरव मोदीचे प्रत्यार्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरार उद्योजक विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्या बाबत एक महत्वाचे उपडेट आले आहे. या दोघांच्या प्रत्यर्पणा संदर्भात लवकरच पाऊले उचलली जाणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे याविषयीच्या हालचालींना वेग येऊ शकेल, मात्र ब्रिटनच्या कोर्टात याबाबतीत अंतिम निर्णय होणे अद्याप बाकी आहे.

2017 मध्ये सुमारे 9000 कोटी रुपये घेऊन लिकर किंग विजय माल्या लंडनला पळून गेला तर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी मिळून भारतीय बँकांची तब्ब्ल 11000 रुपयांची फसवणूक केली. 9000 कोटी रुपयांची थकबाकी न चुकवल्यामुळे सुप्रीम कोर्टने विजय माल्याला फरार घोषित केले. यानंतर सरकाने कारवाई करत विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांची जवळपास 11,900 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा त्यांच्या पुढे मांडला जाऊ शकतो.

लंडनच्या कोर्टात विजय माल्याची केस अजूनही सुरु आहे. वरील सर्व कोर्टात केस हरल्यानंतर मल्ल्याने आता ब्रिटनकडे राजाश्रयाची मागणी केली आहे. मात्र याबाबतीत निर्णय येणे अद्याप बाकी आहे. दुसरीकडे नीरव मोदीने देखील अशीच मागणी केली आहे. नीरव मोदीच्या वकिलाने कोर्टाला सांगितले कि,”नीरव मोदी भारतात गेल्यावर आत्महत्या करू शकतो, यामुळे त्याला इथेच राहण्याची परवानगी मिळावी.” मात्र या दोघांची लवकरच भारतात पाठवणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.